Mumbai Crime : नवी मुंबईत हायड्रो गांजाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त

१ कोटी ३३ लाख रुपये किंमतीचा हायड्रो गांजा व कोकेन जप्त
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

कोपरखैरणे : अमली पदार्थ विरोधी पथकाने हायड्रो गांजा आणि कोकन प्रकरणी आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सहा जणांना अटक करून त्यांच्या कडून १३०० ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा अंमली पदार्थ, ५ ग्रॅम वजनाचा कोकेन अंमली पदार्थ व १२ मोबाईल फोन असा १ कोटी ३३ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अब्दुल रौफ झरीन खान उर्फ अली, व त्याचा मित्र मितुल अरुण मानकुरे, आयान राजकोटवाला, गौरव विश्वजीत चिंदरकर, निरज शहा आणि सुरेश भानुशाली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

शुक्रवारी तुर्भेतील हॉटेल मंडे, येथे छापा टाकून अब्दुल रौफ झरीन खान उर्फ अली, आणि त्याचा मित्र मितुल अरुण मानकुरे यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून एकुण ७० लाख ३५ हजार रुपयांचा ६४८.५ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा व ५ ग्रॅम वजनाचा कोकेन जप्त केला. त्यांच्या चौकशीतून त्यांचा साथीदार आयान राजकोटवाला याला मीरा रोड येथून अटक करण्यात आली. त्याच्या कडून २० लाख ३० हजार रुपयांचा २०३ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

Crime News
महागाईचे आव्हान

हे तिघेही चेंबूर येथील गौरव विश्वजीत चिंदरकर याच्याकडून गांजा घेत असल्याचे समोर येताच तात्काळ हालचाल करीत गौरव याला अटक करण्यात आली. त्याने सदरचा हायड्रो गांजा थायलंड येथे राहणारा त्याचा मित्र वृषांग भानुशालीकडुन मागवित असल्याचे समोर आले. स्थानिक वितरक म्हणून भानुशालीचा पार्टनर घाटकोपर येथील निरज शहा आणि सुरेश भानुशाली यांचे नाव समोर आले.

भानुशाली याला डोंबिवली येथील मिट पॉईन्ट लॉज मधुन ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून ४५ लाख १५ हजार रुपयांचा ४५१.५ ग्रॅम वजनचा हायड्रो गांजा व निरज शहा यांस घाटकोपर येथून ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ४.३० ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला असून त्यांनाही अटक केली आहे.

Crime News
Police Raid: गुटखा तस्करीवर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

एक आरोपी सापडताच वेगवान हालचाली करीत ६ आरोपीना तुर्भे, चेबुर, मिरा रोड, घाटकोपर व डोंबिवली येथुन ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एकूण १३०० ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा अंमली पदार्थ, ५ ग्रॅम वजनाचा कोकेन अंमली पदार्थ व १२ मोबाईल फोन असा १ कोटी ३३ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. यात मुख्य पुरवठादार वृषांग भानुशाली हा थायलंड येथे राहून तेथून हायड्रो गांजाचा पुरवठा भारतामध्ये करीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news