Police Raid: गुटखा तस्करीवर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

1.71 लाखांचा मुद्देमाल जप्त
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

नालासोपारा: वसई पश्चिम येथील सनसिटी परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्या रॅकेटवर माणिकपूर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली असून सुमारे 1 लाख 71 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 जून 2026 रोजी मध्यरात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास सनसिटी वाहतूक चौकीमागे, सनसिटी ग्रास रोड परिसरात संशयित रिक्षाची तपासणी करण्यात आली.

Arrest
Wada Road Condition: शिरीषपाडा ते कांबारे मार्गाची दुर्दशा; खड्डेभरणे मोहीम अपुरी

यावेळी मुसाहिद झाखिर अली 21 याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच-48-सीएक्स-3751 मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. तपासात हा माल मोहम्मद अक्रम रासिद खान 26 आणि त्याचा साथीदार मोहिद खान यांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणला जात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान कमला पसंद पान मसाला, डबल ब्लॅक रॉयल टच प्रीमियम टोबॅको, राज निवास सुगंधित पान मसाला, झेडएन-01 जर्दा पान मसाला, रजनीगंधा पान मसाला आणि तुलसी रॉयल जाफरानी जर्दा असा विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य माल जप्त केला.

Arrest
Dahanu MLA news: धानिवरी अपघातग्रस्तांची आमदार विनोद निकोले यांनी घेतली भेट

कारवाईत एकूण 21 हजार 355 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच 1 लाख 50 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 71 हजार 355 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मुसाहिद झाखिर अली आणि मोहम्मद अक्रम रासिद खान यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना दि. 4 जून 2026 रोजी पहाटे 4.29 वाजता अटक करण्यात आली. माणिकपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news