Firing On RTI Activist: नवी मुंबईत रात्रीच्या अंधारात गोळीबाराचा थरार; RTI कार्यकर्त्यांवर गोळीबार, गाडीवर शिवसेना पक्षाचे चिन्ह

Gun Firing
Gun FiringPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रहिवाशी चाळ सेक्टर 1 ऐरोली मध्ये गोळीबाराची घटना सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात अमित मोरया गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुलुंड मधील फोर्टिज रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Gun Firing
Shocking Incident |अरेरे दुर्दैव..! ओव्हरटेकिंगच्या वादातून गोळीबार; मॉर्निंग वॉक करणाऱ्या निवृत्त ब्रिगेडियर यांचा हकनाक बळी

नेमकं काय घडलं?

गाडीत बसलेले संदीप गवस आणि अमित मोरया यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारच्या घटनेत अमित मोरया यांच्या मानेला गोळी लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांची प्रकृतीत गंभीर असून त्यांना अमित मोरया यांना उपचारासाठी मुलुंड मधील फोर्टिज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोटार सायकल वरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने चार राऊंड फायर केले.अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सोमवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Gun Firing
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

नवी मुंबईत एकच खळबळ

संदीप गवस आणि अमित मोरया आरटीआय कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे .पोलिस सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र गोळीबाराच्या घटनेने नवी मुंबईत एकच खळबळ माजली. ज्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. त्या गाडीवर शिंदे शिवसेना पक्षाचे चिन्ह लावण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news