Navi Mumbai AQI Pollution Level: मुंबईपेक्षा नवी मुंबईत प्रदूषण अधिक; एक्यूआय 200 पार, मुंबईपेक्षा हवा अधिक घातक

सीबीडी बेलापूर, सेक्टर 8 आणि सेक्टर 28 मध्ये धोकादायक पातळी; कौसा-मुंब्रा येथे 240 एक्यूआयने टोक गाठले
Mumbai Air Pollution AQI
Mumbai Air Pollution AQIPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांच्या तुलनेत नवी मुंबईत प्रदूषण अधिक असल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

Mumbai Air Pollution AQI
Maharashtra Divyang Institution Registration: दिव्यांग क्षेत्रातील 900 संस्थांची नोंदणी रद्द; 2025 मध्येच 363 संस्थांवर कारवाई

मुंबईचा सरासरी एक्यूआय हा शुक्रवारी 177 इतका होता. मात्र नवी मुंबईमध्ये (192) तो दोनशेच्या घरात कायम आहे. मुंबईत सर्वाधिक प्रदूषण हे वडाळा येथील भक्ती पार्क (198) परिसरात आढळून आले. त्यानंतर मालाड पश्चिम येथील मीठ चौकी (193) तसेच चेंबूर आणि पवई येथे हिरानंदानी गार्डनचा (191) नंबर लागतो.

Mumbai Air Pollution AQI
Padgha Water Crisis Bhiwandi: पडघ्यात पाणीटंचाई तीव्र; नव्या जलयोजनेचा बोजवारा, ऐतिहासिक विहिरी कचऱ्याखाली

नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक दोनशेपार आहे. त्यात सीबीडी बेलापूर (203) तसेच सेक्टर 8 (206) आणि सेक्टर 28 भागाचा (201) समावेश आहे. बेलापूरनंतर खारघर (191) आणि घणसोलीमध्ये (188) प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. दोनशेहून अधिक एक्यूआय हा प्रदूषणाची आरोग्यासाठी अतिघातक हवेची कॅटेगरी आहे. मुंबई आणि नवी मुंबईला प्रदूषणाने वेढले असले तरीही नवी मुंबईजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कौसा भागातील (मुंब्रा) शिमला पार्क येथे (240) प्रदूषणाने टोक गाठले आहे.

Mumbai Air Pollution AQI
Mahim Causeway Bandra: माहीम कॉजवे–वांद्रे जंक्शन कोंडीला दिलासा; 220 कोटींच्या उड्डाणपुलासाठी पालिकेची निविदा

मुंबई एक्यूआय : 177

भक्ती पार्क (वडाळा) :198

मीठ चौकी (मालाड) :193

चेंबूर/हिरानंदानी गार्डन (पवई) :191

लोखंडवाला कॉम्प्लेक्स (अंधेरी) :190

बोरिवली (पश्चिम) :188

Mumbai Air Pollution AQI
Mumbai Property Tax: मालमत्ता कर थकबाकीदारांवर पालिकेचा मोठा दंडुका; 455 कोटींच्या मालमत्तांचा ई-लिलाव जाहीर

कन्नमवार नगर :187

नवी मुंबई एक्यूआय :192

सीबीडी बेलापूर :203

सेक्टर 8 :206

सेक्टर 28 : 201

खारघर :191

घणसोली : 188

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news