Navi Mumbai air quality plan : नवी मुंबईला हवा गुणवत्तेसाठी आता 18 महिन्यांचा प्लॅन

हवा गुणवत्तेसाठी 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅनला विशेष सभेत मंजुरी
Navi Mumbai air quality plan
नवी मुंबईला हवा गुणवत्तेसाठी आता 18 महिन्यांचा प्लॅनpudhari photo
Published on
Updated on

नवी मुंबई ः नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन हाती घेतला असून यासाठी 30 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

हा प्रस्ताव गुरुवारी विशेष सभेत मांडण्यात आला. पीएम 10, पीएम 2.5 (पर्टिक्युलेट मॅटर) प्रदूषणपातळी कमी करण्यासाठी या योजनेला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन सभागृहात मांडला. त्यानुसार सघनकृती योजना अत्यंत प्रभावी ठरणार असून या योजनेची प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि एक रोल मॉडेल निर्माण करावे, असे आवाहन नाईक यांनी प्रस्ताव मांडताना केले.

Navi Mumbai air quality plan
Pimpri Chinchwad Budget 2026: पिंपरी-चिंचवडचा अर्थसंकल्प मंजूर; 414 कोटींची वाढ, पवना प्रकल्पाला चालना

नवी मुंबईत प्रदूषण करणारे आरएमसी प्लांट आणि बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्याकडून 4 कोटी 63 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एसओपीचे उल्लंघन करणाऱ्या 82 विकासकांकडून 1 कोटी 58 लाखांचा दंड वसूल केला आहे.

महापालिकेने शहरातील विकासकामांच्या जागी प्रमाणित केलेल्या मशीन व्यावसायिकांना बंधनकारक केल्या आहेत. यापूर्वीच सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन मुंबई महापालिकेने तयार केला आहे, तर कौन्सिलिंग अँड एनर्जी इन्व्हार्मेंटनुसार प्रदूषणाचे मापन सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले.

Navi Mumbai air quality plan
Deepika Padukone: "मुंबई गुदमरतेय, हे कसं काय चालतंय?" प्रदूषणावरून दीपिका पदुकोण संतापली; पाहा महापौरांनी काय दिलं उत्तर?

आशा राबवणार उपाययोजना

  • आठ नोडमधील हवा व वायू प्रदूषण सेन्सर बसवणार.

  • अधिक प्रदूषण असलेल्या भागांत 12 मोठे हवेच्या गुणवत्तेचे सेन्सर.

  • प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी संयुक्त समिती नेमणार.

  • नियमांचे पालन न केल्यास पालिकेकडून कारवाई होणार.

  • खोदकाम आणि बांधकाम प्रकल्पासाठी एअर क्वालिटी सिस्टीम सक्तीची.

  • व्हॅक्यूम स्विपिंग मोहिमेच्या माध्यमातून धूळ नियंत्रण.

  • वीज संचित जनरेटरच्या माध्यमातून वायू उत्सर्जित ठिकाणी अनुपालन मानके बसविणार.

नवी मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सघनकृती योजनाही अत्यंत महत्त्वाची आहे. हवा प्रदूषित करणाऱ्या कारणांची मीमांसा जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जातील. 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन हा सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त शहराकरिता महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

सुजाता पाटील, महापौर, नवी मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news