Property investment fraud : नवी मुंबई परिसरात गृहखरेदीचा दोन हजार कोटींचा घोटाळा

आ. गोपीचंद पडळकर यांचा आरोप
Property investment fraud
Property investment fraudpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : नवी मुंबई परिसरात गृहखरेदीसाठी शेकडो गरजुंकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाची सह पोलीस आयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जवळपास दोन हजार कोटींचा हा घोटाळा असून चौकशीनंतर सर्व दोषींवर कठोर कारवाई होणार, कोणाचीही सुटका होणार नाही, असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पडळकर म्हणाले की, डीडीएसआर ग्रूप अंतर्गत सचिन मोटे या शासकीय अधिकाऱ्याने आपल्या नातलगांच्या नावावर अनेक कंपन्या नोंदवत नवी मुंबई परिसरात जवळपास 20 इमारत बांधकाम प्रकल्पांचे काम हाती घेतले.

Property investment fraud
DDSR Scam Mumbai | 'डीडीएसआर’चा कोट्यावधीचा घोटाळा; विधानसभेत गोपीचंद पडळकरांचा २ हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप

आपल्या पदाचा गैरफायदा घेत, नियमांचे उल्लंघन करत फ्लॅट बुक केलेल्या शेकडो नागरिकांची फसवणूक केली. यासंदर्भात बुधवारी विधिमंडळात मुद्दा मांडला असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतल्याचे पडळकर यांनी सांगितले.

डीडीएसआर ग्रूपने गुंतवणूकदारांना दामदुप्पट करून देतो असे लालूच दाखवत हजारो कोटी रुपये गोळा केले. त्या पैशांतून इमारत निर्माणासाठी नवी मुंबईत अनेक प्लॉट्स विकत घेतले. जीएसटी, स्टॅम्प ड्यूटीतून सूट मिळवण्यासाठी सोसायट्या बनवल्या. त्यातून सरकारचा महसूल बुडविल्याचा आरोपही पडळकर यांनी केला.

Property investment fraud
Swachh Maharashtra scam: स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 12 हजार कोटींचा घोटाळा

सातारा, सोलापूर, सांगलीतील शेकडो सामान्य लोकांनी डीडीएसआरच्या गृहनिर्माण प्रकल्पांत फ्लॅट बुकिंग केले, त्यांचीही फसवणूक करण्यात आली आहे, असे पडळकर म्हणाले. 20 इमारत निर्माणाच्या माध्यमातून दोन हजार कोटींची फसवणूक करर्ण़ायांवर गुन्हे दाखल करून, कसून चौकशीअंती दोषींना कठोर शासन होईल, असा विश्वासही पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news