Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना मोठा दिलासा! ५ सप्टेंबरपासून १० टक्के पाणीकपात बंद

आजपर्यंत मोरबे धरणाची पातळी ही 88 मीटर असून आजची पातळी 86.55 मीटर एवढी आहे.
Water
Water Pudhari
Published on
Updated on

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: मोरबेच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या पावसामुळे धरणातील साठा 92.93 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र प्रत्यक्षात मोरबे धरणात उपायुक्त पाणीसाठा हा 146.420 दलघमी ( 76.70 टक्के) एवढाच आहे.

आजपर्यंत मोरबे धरणाची पातळी ही 88 मीटर असून आजची पातळी 86.55 मीटर एवढी आहे. 25 मेपासून 10 टक्के पाणी कपात लागू केली होती.ती येत्या 5 सप्टेंबर गोकुळाष्टमीपासून पाणीकपात बंद करण्याचा निर्णय महापौर सुजाता पाटील आणि महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

Water
Hospital Safety Audit: रुग्णालयांचे दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचे निर्देश

पावसाळ्याच्या सुरुवातीला मोरबे धरणातील घटलेल्या पाणीसाठ्यामुळे नवी मुंबईसमोर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटातून यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मोरबे धरणाची पाणीपातळी मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता 86.55 मीटर, तर पाणीसाठा 92.93 टक्के नोंदविण्यात आला.

1 जूनपासून आतापर्यंत 3036.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून शहरात आतापर्यंत 3036.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मोरबे धरणातील पाणीसाठा मे महिन्याच्या अखेरीस झपाट्याने कमी झाल्याने महापालिकेला पाणीपुरवठ्याबाबत कठोर उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. 25 मेपासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. तसेच जलतरण तलाव बंद करणे आणि दुपारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वाढती लोकसंख्या, नवीन बांधकामे आणि विविध प्रकल्पांमुळे पाण्याची मागणी वाढत असताना धरणातील घटत्या साठ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले होते.

Water
Tribal Students Hemoglobin Test: राज्यातील २०४ आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी; ७९,६२४ विद्यार्थ्यांची तपासणी

दरम्यानच्या काळात मोरबे धरणाची पाणीपातळी 86.55 मीटरपर्यंत पोहचली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत शहराला पाणीकपातीतून दिलासा देण्याची मागणी केली होती. परंतु, बदलते हवामान आणि दीर्घकालीन पाण्याचे नियोजन लक्षात घेता, तूर्तास तरी पाणीकपात रद्द न करण्याचा निर्णय आयुक्तांनी जाहीर केला होता.

मोरबे धरणाची क्षमता 180.890 दलघमी असून धरणातील आजपर्यंतचा पाणीसाठा 177.020 दलघमी म्हणजेच 92.93 टक्के एवढा आहे. तर मृत पाणीसाठा हा 5.520 दलघमी ( 2.89 टक्के) आहे. एकूण उपायुक्त पाणीसाठा हा 146.420 दलघमी ( 76.70 टक्के) मोरबे धरणाची पातळी ही 88 मीटर असून आजची पातळी 86.55 मीटर एवढी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news