‘नॅचरल्स आईस्क्रीम’चे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन; मुंबईतून ‘असे’ उभे केले ४०० कोटींचे साम्राज्य

रघुनंदन कामत यांचा मृत्यू
रघुनंदन कामत यांचा मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: भारतातील 'आईस्क्रीम मॅन' अशी ओळख असणारे रघुनंदन श्रीनिवास कामत यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ते देशातील आघाडीच्या आइस्क्रीम ब्रँडपैकी नॅचरल्स आईस्क्रीम कंपनीचे संस्‍थापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. रघुनंदन श्रीनिवास कामत यांच्‍यावर मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचार सुरु होते. १७ मे रोजी रात्री त्‍यांनी अखेरचा श्वास घेतला.

फळविक्रेत्याचा मुलगा ते ख्‍यातनाम आइस्क्रीम ब्रँडचे मालक

रघुनंदन यांचे वडील फळविक्रेता होते. त्‍यांनी आपल्या वडिलांना फळांच्या व्यवसायात मदत केली. त्‍यामुळे फळांबद्दल
त्‍यांना सखोल माहिती मिळण्‍यास मदत झाली. वयाच्‍या १४ व्‍या वर्षी मंगळूर या मूळ गावातून ते मुंबईत आले. येथे त्‍यांना भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली.

चार कर्मचार्‍यांसह आईस्क्रीमच्या व्यवसायात टाकले पाऊल

14 फेब्रुवारी 1984 रोजी त्यांनी चार कर्मचाऱ्यांच्या टीमसह आईस्क्रीमच्या व्यवसायात पाऊल टाकले, काही मूलभूत घटक आणि नैसर्गिक आइसक्रीम या ब्रँडचा जन्‍म झाला. कंपनी सुरू झाली तेव्हा तिने फक्त 12 फ्लेवर्स ऑफर केले, रघुनंदन यांच्या वडिलांसोबत फळ व्यवसायातील अनुभवातून विकसित झाले. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, त्यांनी पावभाजीसह साइड डिश म्हणून आइस्क्रीम विक्री केली. पहिल्याच वर्षी, जुहू येथील त्यांच्या छोट्याशा दुकानातून 5 लाख रुपयांची कमाई करण्यात यश आले. यानंतर त्‍यांनी मागे वळून पाहिले नाही. 'नॅचरल्स आईस्क्रीम'चे 2020 पर्यंत देशभरात 135 आउटलेट होते.

असा होता नॅचरल्स आईस्क्रीम कंपनी उभी करण्याचा प्रवास

सुरुवातीच्या दिवसांमध्ये, त्याच्या कंपनीने फक्त 12 फ्लेवर्सचे आइस्क्रीम विकायला सुरुवात केली होती. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कामत पावभाजी विकत होते आणि तसेच साइडला आईस्क्रीमची ऑफर करत असायचे. यामुळे सगळे त्यांच्या बाजूने वळले आणि अनेक ग्राहक आकर्षित झाले. नॅचरल्स आईस्क्रीमने जसजशी लोकप्रिय होत गेली, कामत यांनी फक्त आईस्क्रीम व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांनी नवीन उत्पादने करण्यात सुरुवात केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news