Navi Mumbai Police Drug Disposal | ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाला मोठे बळ: 56 कोटींच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये ही कारवाई करण्यात आली
Drug Free Navi Mumbai Campaign
तब्बल 56 कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश केलाPudhari
Published on
Updated on

Drug Free Navi Mumbai Campaign

पनवेल : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलिसांनी ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानांतर्गत मोठी कारवाई करत तब्बल 56 कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश केला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये ही कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 26 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हेरॉईन, गांजा, एमडी (मेफेड्रोन), कोकेन तसेच इतर अमली पदार्थ या वेळी नष्ट करण्यात आले. अमली पदार्थांची वाढती तस्करी आणि युवकांमध्ये वाढणारे व्यसन रोखण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला.

Drug Free Navi Mumbai Campaign
Navi Mumbai Airport | विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे; राजेंद्र पाटील यांनी रक्ताने लिहले पंतप्रधानांना पत्र!

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून समाजात जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला. युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहावे, तसेच परिसरात अमली पदार्थांची विक्री किंवा सेवनाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले.

या कारवाईमुळे अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला अधिक बळ मिळणार असून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Drug Free Navi Mumbai Campaign
Navi Mumbai Airport Leakage | पहिल्याच पावसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गळती; टर्मिनलमधील बॅगेज बेल्ट परिसरातील व्हिडिओ व्हायरल

यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची कारवाई भविष्यातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news