Narsapur Crime News Update: 'तो' कायदा पुन्हा करा... मुख्यमंत्र्याचे आदेश; कुटुंबीयांची प्रतिक्रिया पोलिसांसाठी मोठा पुरावा

Narsapur Crime News Update
Narsapur Crime News Updatepudhari
Published on
Updated on

Narsapur Crime News Update: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथील ३ वर्षाच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून त्यांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत विधी व न्याय विभागाला काही महत्वाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आरोपी भीमराव कांबळेच्या कुटुंबियांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा पुरावा म्हणून वापर पोलीस करणार आहेत.

Narsapur Crime News Update
Nasarapur Case SIT : नसरापूरप्रकरणी एसआयटी स्थापन, नराधमाला फाशी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस

नरसापूर प्रकरणातील आरोपी यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक झाली होती. लैंगिक प्रकरणातील आरोपी हे ८० ते ९० टक्के त्यात गुन्ह्यात अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात. पॅरोलच्या काळातच ते पुन्हा तेच गुन्हे करतात. २०१४ ते २०१९ दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका, असा कायदा केला होता. तो 2-3 वर्ष अस्तित्वात होता. पण कालांतराने तो न्यायालयाने रद्द केला.

Narsapur Crime News Update
Nasrapur Protest | नसरापुरात वातावरण चिघळले; महामार्गावर पोलिसांचा आंदोलकांवर लाठी चार्ज

आता पुन्हा तसा कायदा करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत. हे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटे यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

Narsapur Crime News Update
Bhor Crime: भोर हादरलं! 3 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचारानंतर नरसापुरात संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा; बाजारपेठा बंद

दरम्यान, पुण्यातील नरसापूर प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया पोलिसांसाठी मोठा पुरावा असल्याचं मानलं जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या कुटुंबीयांनी दिलेली प्रतिक्रिया ही न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाणार आहे.

आरोपी भीमराव कांबळेच्या कुटुंबीयांनी आज त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली होती. कुटुंबीयांची हीच प्रतिक्रिया पोलिसांसाठी मोठा पुरावा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news