Naigaon water shortage: नायगाव बीडीडी टॉवर्सचा पाणीप्रश्न सुटणार; मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्यांबाबत पालिका-म्हाडा चर्चा

नव्या इमारतींमध्ये राहायला गेलेल्या रहिवाशांना पाणीटंचाईचा त्रास; म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये उपाययोजनांबाबत चर्चा
BMC
BMCpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळींतून पुनर्विकसित इमारतींमध्ये राहायला गेलेल्या रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. याबाबत म्हाडा आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच चर्चा पार पडली.

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुरू आहे. नायगाव येथील नव्या घरांमध्ये सध्या शेकडो रहिवासी वास्तव्यास आले आहेत. त्यांना पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

BMC
Murud beach tragedy case: चौदा विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना १० वर्षांनंतर दिलासा; एफआयआर रद्द

सहा लाख लीटर पाणी पुरवठ्याची गरज असताना पालिकेकडून साडे चार लाख लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. मुळातच पाणी पुरवठा आणि सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात यामुळ रहिवासी त्रस्त आहेत.

नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल’असे नामकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पात दोन पुनर्वसन इमारतींत एकूण २० टॉवर बांधण्यात येत आहेत.

BMC
Bombay High Court: धर्मांतराच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण; कायद्यातील तरतुदींना आव्हान

यात पुनर्विकास प्रकल्पाच्या पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील एकूण ८ टॉवर्सपैकी ५ टॉवर्समधील ८६४ सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ मार्चला करण्यात आले होते. त्यानंतर ५ जूनपासून आणखी ५३७ घरांचे वितरण करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news