

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या एचएमपीव्ही विषाणूचे नागपुरात दोन संशयित रूग्ण सापडल्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटक यांनी आज दुपारी ३ वाजता आरोग्य विभागाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, सर्वांनी काळजी घ्या आणि आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करा, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले आहे.
चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या एचएमपीव्ही व्हायरसबाबात योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या आजारामुळे कोणत्याही माणसाच्या जीवाला धोका होत नाही. प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रूग्णांनी काळजी घ्यावी आणि सर्वांनी आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.