Naam Foundation Makarand Anaspure Nana Patekar|'नाम'ची मुहूर्तमेढ

Naam Foundation Makarand Anaspure Nana Patekar|'नाम'ची मुहूर्तमेढ
Nana Patekar
Naam Foundation Makarand Anaspure Nana Patekarfile photo
Published on: 
Updated on: 

२०१५ सालच्या एका सायंकाळी नाना पाटेकर 'एकच प्याला' घेऊन बसले होते. समोर टीव्ही सुरू होता. त्याचवेळी त्यांच्या डोक्यात आलिशान कार घेण्याचा विषय घोळत होता. त्यासाठी त्यांनी दीड कोटी रुपये बाजूला काढून ठेवले होते. आठवडाभरात चांगली गाडी घेऊ, असा त्यांचा विचार चालला होता. तोच समोर टीव्हीवर शेतकरी आत्महत्येची बातमी झळकली. त्यावर्षी दुष्काळ पडला होता.

एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे निवेदिकेने सांगताच नाना पाटेकर अस्वस्थ झाले. त्या शेतकऱ्याची पत्नी आणि मुले यांची प्रतिक्रिया टीव्हीवर दाखवली गेली. त्या मुलांच्या डोळ्यांत केवळ दुःखच नव्हते तर भूकही होती. ते चित्र पाहून नाना हेलावून गेले. आपण गाडी का घ्यावी, असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला. त्यांनी तातडीने त्यांचा मित्र अभिनेता मकरंद अनासपुरेला फोन केला.

अनासपुरे स्वतः मराठवाड्यातले असल्याने त्यांना शेतकरी आत्महत्येची माहिती होती. अनासपुरे यांना नानांनी फोनवरूनच सूचना करत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार पाठवत असल्याचे सांगितले. सुरुवातीला आपण काहीतरी चांगले काम केल्याचे या दोघांनाही वाटले. पण त्यानंतर मकरंद अनासपुरेने तिथेच न थांबता अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी काहीतरी वेगळे केले पाहिजे, असे सुचविले.

नाना पाटेकर यांनी बीडला जावे आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना प्रत्यक्ष भेटावे, अशी गळ घातली. त्यानंतर नाना पाटेकर बीडला गेले. सुमारे २५० महिलांना ते भेटले. या सर्वांच्या पतींनी कर्जबाजारी होउन आत्महत्या केली होती. त्यांची मुले आपल्या आईच्या मांडीवर पाटेकर अत्यंत भावूक झाले. या मुलांसाठी काहीतरी करायला हवे, हा विचार त्यांच्या मनात चमकला. तेथूनच 'नाम' या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

दुष्काळामुळे फटका बसून आत्महत्या केलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नामच्या माध्यमातून मदत करण्याचे ठरले. पुढे या संस्थेने जलसंवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, झरे, नाले, तलाव यांची साफसफाईची कामे हाती घेतली. त्याचबरोबर भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न नामच्या माध्यमातून सुरू झाले. त्याचबरोबर ग्रामविकास, शिक्षण, रोजगार या विषयांवरही 'नाम' ने लक्ष केंद्रीत केले. नाना पाटेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून 'नाम' ला अनेक थरातून देणग्या येवू लागल्या. त्यात केवळ बड़े उद्योगपतीच नव्हते तर सामान्य मध्यमवर्गियांनीदेखील आपापल्या पद्धतीने हातभार लावला.

Nana Patekar
रंगभूमीवरचा नटसम्राट - नाना पाटेकर

'नाम' च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुर्तीचे विवाह लावून देण्यात आले. कोविड काळात या संस्थेने अनेक लोकांना मदत केली. शिवाय विविध कार्यक्रमांमधून नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती प्रभावीपणे मांडली. शेतकऱ्यांची आत्महत्या हा केवळ आकडा म्हणूनच पाहिला जात होता. तो दृष्टिकोन त्यांनी पूर्णपणे बदलून टाकला. निर्मल गजानन फाउंडेशनच्या माध्यमातूनही नाना पाटेकर यांनी शिक्षण, आरोग्य, मदतकार्य या विभागात योगदान दिले.

Nana Patekar
Nana Patekar rifle shooter |उत्कृष्ट नेमबाज-नाना पाटेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news