

मुंबई : असलम शेख यांच्या मृत्यूनंतर जागे झालेल्या पालिका प्रशासनाने शुक्रवारी (दि.3) सकाळपासूनच मुंबईतल्या रस्त्यावरती ड्रेनेज टाक्यांची पाहणी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले होते. चर्चगेट, चर्नी रोड, मरीन लाईन्स स्थानकाबाहेरच्या महर्षी कर्वे मार्गावरती पालिका ए विभाग आणि सी विभागातील अधिकारी व कर्मचारी ड्रेनेज टाक्या उघडून पाहणी करत असताना रस्त्यावर दिसून आले.
यापैकी ड्रेनेज टाक्यांमध्ये काही ठिकाणी लोखंडी जाळ्या लावलेल्या आढळून आल्या. परंतु त्या जाळ्यांना अतिशय गंज लागल्याच्या अवस्थेत आढळल्या. तर काही ड्रेनेज टाक्यांमध्ये लोखंडी जाळ्या न लावल्याचे दिसून आले.
जुन्या जाळ्या किती सुरक्षित आहे याची देखील पालिका अधिकारी पाहणी करत होते. ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन मध्ये लोखंडी जाळ्यवलेल्या आढळून आल्या नाही. त्या ठिकाणी लवकरच नागरिकांच्या सुरक्षे करता जाळ्या लावण्यात येणार असल्याचे समजले.