

Mumbai Women Toilets Issue
मुंबई : मुंबई शहरात सार्वजनिक शौचालयांची स्थिती दयनीय असून यात महिलांसाठी अपुरी व्यवस्था असल्याने त्यांची कुचंबना सुरूच असल्याचे वास्तव प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात मांडले आहे. यात त्यांनी 2023 सालच्या आकडेवारीनुसार महानगरांतील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी 6800 म्हणजे 69 टक्के सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी व 60 टक्के शौचालयांत वीज जोडणीच झालेली नसल्याचेही म्हटले आहे.
मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक शौचालये कमी आहेत. स्वच्छ भारत अभियानानुसार एका शौचालयाचा वापर करणार्या पुरुषांची संख्या 35 आणि स्त्रियांची संख्या 25 असायला हवी. मात्र, मुंबईत 86 पुरुष आणि आणि 81 महिला एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत. 2023 च्या आकडेवारीनुसार दर 4 सार्वजनिक शौचालयातील केवळ एक शौचालय स्त्रियांसाठी आहे. शौचालयांचा तुटवडा असून पाणी जोडणी व वीज जोडणी नसलेल्या शौचालयांची संख्याही निम्माहून अधिक आहे. ज्या प्रभागामध्ये व्यापारी व सांस्कृतिक कारणांमुळे ये- जा करणार्या रहिवाशांचे प्रमाण अधिक आहे तेथील स्थिती तर अधिक बिकट असल्याचे अहवालत म्हटले आहे.
मुंबईतील स्वच्छता व आणि वायू प्रदूषण समस्यांचा उहापोह अहवालत केला आहे. 2024 मध्ये मुंबईकरांनी 1.15 लाखाहून अधिक तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारसंख्येत 2015 च्या तुलनेत 70 टक्के वाढ झाली आहे. मागील 10 वर्षांतील तक्रारींत घनकचरा तक्रारी 380 टक्केने तर प्रदूषणा संदर्भातील तक्रारी 334 टक्केनी वाढल्या आहेत.
9 टक्के शौचालयांत पाणी नाही
60 टक्के शौचालयांत वीज नाही
मिलिंद म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रजा फाऊंडेशन
नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होईल याची खबरदारी घ्यावी आणि नागरिकांचे अभिप्राय घेऊन पारदर्शकता वाढवावी. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील आकडेवारी आणि माहिती अधिकारातील प्राप्त आकडेवारी यामध्ये विसंगती आहे.