Mumbai weather updatefile photo
मुंबई
Mumbai Weather Update | मुंबईत आजपासून तुरळक अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेले काही दिवस कमाल तापमानात घट झाली आहे. सोमवारपासून तापमानात आणखी घट होईल.
Mumbai Weather Update |
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेले काही दिवस कमाल तापमानात घट झाली असतानाच रविवारपासून काही भागांमध्ये तुरळक अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.
सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेमध्ये शनिवारी (३३ अंश सेल्सिअस) कमाल तापमान पस्तिशीखाली आले. रविवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. सोमवारपासून तापमानात आणखी घट होईल. सोमवार आणि मंगळवारचे ३१ अंश सेल्सिअस तापमान हे मे महिन्यातील सर्वात कमी कमाल तापमान असेल.
शनिवारपासून तापमानात घट होत असताना मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये तुरळक अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर मंगळवार आणि बुधवारी जोरदार सरी पडू शकतात. तसेच रविवार ते शुक्रवार या कालावधीत वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

