Mumbai Water Tax: मुंबईकरांना मोठा दिलासा! पाणीपट्टी वाढीला राज्य सरकारचा ‘रेड सिग्नल’

मुंबईतील पाणीपट्टी वाढीला राज्य सरकारने रेड सिग्नल दिल्याची माहिती आहे. चार वर्षे वाढ न झाल्याने पालिकेचा 1,000 कोटींपेक्षा अधिक महसूल बुडाला.
Mumbai Water Tax
Mumbai Water TaxPudhari
Published on
Updated on

मुंबई: निवडणुकांमध्ये मुंबईकरांना देण्यात आलेल्या वचनाची पूर्तता म्हणून पाणीपट्टीवाढीला राज्य सरकारने रेड सिग्नल दाखवला आहे. गेल्या चार वर्षापासून पाणीपट्टीमध्ये वाढ न झाल्यामुळे पालिकेचा १ हजार कोटीपेक्षा जास्त महसूल बुडाला आहे.

कर्मचार्‍यांचा पगार व अन्य भते, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च व शासनाच्या भातसा व अप्पर वैतरणा धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी असा एकत्रित खर्चाचा आढावा घेऊन, दरवर्षी ८ टक्केपर्यंत पाणीपट्टी वाढवण्यात येते.

Mumbai Water Tax
Mumbai Bhuleshwar Cha Raja: मुंबईत भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळून दोघे ठार

स्थायी समितीनेच तशी परवानगी दिली आहे. परंतु लोकसभा, विधानसभा व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी पाणीपट्टीवाढ करणार नसल्याचे वचन मुंबईकरांना दिले होते.

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत ८ टक्केपर्यंत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला. पालिका आयुक्तांनीही या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. दरवर्षी १६ जूनला पाणीपट्टीमध्ये वाढ करण्यात येते.

Mumbai Water Tax
Sada Sarvankar: विशाखा राऊत यांची जात सूर्यवंशी क्षत्रिय... नगसेवक पद रद्द करणे योग्यच, सरवणकरांनी लगेच भेटीगाठी केल्या सुरू

यावेळीही घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान प्रति एक हजार लिटरमागे ३५ पैसे ते ५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता होती. परंतु राज्य सरकारकडून पाणीपट्टी वाढू नये असे निर्देश दिल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news