Mumbai Bhuleshwar Cha Raja: मुंबईत भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळून दोघे ठार

Mumbai Ganpati Incident: भयंकर बाब अशी की कोसळलेल्या मूर्तीखाली मंडळाचे तरूण तडपदार अध्यक्ष संकेत नेवशेच सापडले.
bhuleshwar cha raja 2026 Incident
bhuleshwar cha raja 2026 IncidentPudhari
Published on
Updated on

Mumbai Bhuleshwar Cha Raja Ganpati Incident

मुंबई : मुंबईतील विविध गणेश मंडळांचे राजे-महाराजे आपापल्या मंडपांमध्ये दाखल होत असताना आणि संपूर्ण मुंबापुरीला गणरायाच्या उत्सवाचे वेध लागले असताना शनिवारी अघटित घडले. भुलेश्वरचा राजा आपल्या मंडपापासून ५० ते ६० फूट अंतरावर असतानाच भयंकर विघ्न कोसळले. राजाची ही महाकाय मूर्ती कुणाला काही कळण्याच्या आत कोसळली आणि मूर्तीच्या खाली अनेक जण सापडले. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बृजेश जोशी हे दोेघे ठार झाले असून, अन्य पाच जण जखमी आहेत.

भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे हे ६३ वे वर्ष आहे. भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून राजाची मूर्ती शनिवारी संध्याकाळी वाजत-गाजत भुलेश्वरमधील आपल्या मंडळाकडे निघाली. मात्र, प्रतिष्ठापनेपूर्वीच मूर्तीच्या विसर्जनाचे संकट कोसळले. मंडपापासून काही अंतरावर असतानच ज्या क्रेनवर या २७ फूट उंच मूर्तीचा भार तोलून धरला होता ती क्रेन कमजोर निघाली आणि क्रेनमधून निसटलेली राजाची मूर्ती सरळ खाली कोसळली.

bhuleshwar cha raja 2026 Incident
Mumbai Goa highway traffic : गणेशोत्सवात यंदाही महामार्गावर वाहतूककोंडीचे विघ्न ?

मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे या मूर्तीखाली सापडले. त्यांना रिलायन्स रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पदाधिकारी बृजेश जोशी यांना जी. टी. रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अन्य दोन जखमी दाखल आहेत. सैफी रुग्णालयात एक जखमी दाखल असून, जेजे रुग्णालयातही दोन जखमी दाखल झाल्याचे सांगण्यात आले.

भंगलेल्या मूर्तीचे आज विसर्जन
पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांनी पुढारीला सांगितले की, भुलेश्वरमधील समुद्रीमाता मंदिराजवळ हा प्रकार घडला. तो घडण्याची कारणे आम्ही तपासत आहोत. बंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी या संपूर्ण घटनेची रीतसर चौकशी होईल. आधी भुलेश्वर राजाची भंगलेली मूर्ती विसर्जित केली जाईल आणि मग प्राथमिक तपास करून गुन्हे दाखल केले जातील.

असा अपघात होऊ शकतो? असे घडूच कसे शकते? या प्रश्नांनी मुंबईतील गणेश मंडळांचे धाबे दणाणले आहे. कुणाची मूर्ती सर्वांत उंच ही स्पर्धा वर्षानुवर्षे शिगेला पोहचत चालली असताना अशीच उंच असलेली तब्बल २२ फुटांची भुलेश्वर राजाची मूर्ती क्रेनच्या केबलला झेपली नाही. भयंकर बाब अशी की कोसळलेल्या मूर्तीखाली मंडळाचे तरूण तडपदार अध्यक्ष संकेत नेवशेच सापडले.

अशा उंच मूर्ती पीओपीमध्येच तयार होऊ शकतात. शाडूच्या मातीतून तयार होणार्‍या मूर्तींना मुळात या उंचीची मर्यादा येवून पडते त्‍यामुळे उंचीची स्पर्धा खेळणार्‍या मंडळांनी दरवर्षी पीओपीबंदी मोडीत काढण्यासाठी खटपटी-लटपटी केल्या. यंदाही कोर्टबाजी झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने मोठ्‍या मूर्तींचे विसर्जन समुद्र तथा नैसर्गिक तलावांत करण्यास तूर्त अनुमती दिली. यासंदर्भातील अंतिम निकालापर्यंत ही परवानगी राहिल. हा निकाल मागच्याच आठवड्‍यात आला आणि आता पीओपी पासून तयार केलेली भुलेश्वर राजाची महाकाय मूर्ती कोसळली. अशा मूर्ती समूद्रात विसर्जन करतानाही खास तराफा न्यावा लागतो. तशीच काळजी मूर्ती मंडपात आणतानाही घ्यावी लागते.

bhuleshwar cha raja 2026 Incident
Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा आणि स्थलांतराचा वाद काय आहे? हिंदू महासभा विरोध का करतेय?

प्रत्‍यक्षदर्शीने सांगितले की, भुलेश्वर राजाचा भायखळा ते भुलेश्वर प्रवास तसा सुरळीत पार पडला. भुलेश्वर राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे यांनी भुलेश्वरच्या नाक्यावर या मूर्तीसमोर माजी नगरसेवक दिलीप नाईक यांच्यासह फोटो काढला. दुर्घटनेच्या १५ सेकंदापूर्वीचा हा फोटो काढण्यात आला होता. तिथून प्रतिष्ठापनेची जागा एका मिनिटावर होती. तेवढ्यात राजाची मूर्ती कोसळली आणि यंदाच्या गणेशोत्‍सवावर दुःखाचे सावट पसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news