Mumbai Water Tanker Strike: पाणीटंचाईत भर टँकर बंदची; १८ हजारपैकी एकाही टँकरने पाणीपुरवठा झाला नाही

बांधकामे, हॉटल्‍सच्‍या अडचणी वाढणार
Mumbai Water Tanker Strike
Mumbai Water Tanker StrikePudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईकर दहा टक्‍के पाणीकपात सहन करीत असताना सोमवारपासून मुंबईतील टॅकरमालकांनीही संप पुकारला आहे. सोमवारी दिवसभरात १८ हजारपैकी एकाही टँकरने मुंबईत पाणीपुरवठा झाला नाही.

पूर्वकल्‍पना असल्‍याने बांधकाम प्रकल्‍प व सोसायट्यांनी नियोजन केल्‍याने सोमवारी या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र संप सुरूच राहल्‍यास मुंबईकरांची अडचण होणार आहे.

विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी काढण्यास शासनाने हरकत घेतल्याने मुंबईतील वॉटर टँकरमालकांनी संपाचा इशारा दिला होता. सोमवारी उपनगर जिल्‍हाधिकारी कार्यालयात टँकरमालकांशी चर्चा करण्‍यात आली.

केवळ नोटिसा बजावण्‍यात आल्‍या आहेत. कारवाई केली नाही. त्‍यामुळे संप मागे घेण्‍याची विनंती प्रशासनाकडून करण्‍यात आली. मात्र शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने टँकरमालकांनी बेमुदत संप पुकारल्‍याचे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे प्रवक्ते अंकुर शर्मा यांनी सांगितले.

Mumbai Water Tanker Strike
Minor Girl Molestation: आठ वर्षांच्या मुलीशी अश्‍लील चाळे करुन विनयभंग; २२ वर्षांच्या आरोपीस अटक

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे १८ हजार वॉटर टँकर मुंबईतील मोठ्या सोसायट्या, हॉटेल उद्योग, उद्याने, वाहतूक बेटे यांना दररोज ३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सोमवारी येथे टँकरने पाणीपुरवठा झाला नाही. मात्र पूर्वकल्‍पना असल्‍याने टंचाई भासली नाही.

मुंबईत रस्‍त्‍यांच्‍या कामांसाठीही या पाण्‍याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र ही कामे पालिकेने आता पासाळ्यामुळे थांबवली आहेत. त्‍यामुळे त्‍याचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र पुढील दोन-तीन दिवस संप सुरूच राहिल्‍यास मुंबई मोठी पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

Mumbai Water Tanker Strike
Uniform Delay: पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा पहिला महिना जुन्‍या गणवेशात; शालेय वस्तूंचे वाटप लांबणीवर

दोन-तीन दिवसांचा साठा

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संपाची पूर्वसूचना दिल्यामुळे अनेक सोसायट्यांनी दोन-तीन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा राखून ठेवला आहे. शिवाय शनिवारपासूनच पाणीकपात केली होती. अनेक बांधकाम प्रकल्पांनीसुद्धा पाणी राखून ठेवले आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस तरी संपाची मोठी झळ बसणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news