Minor Girl Molestation: आठ वर्षांच्या मुलीशी अश्‍लील चाळे करुन विनयभंग; २२ वर्षांच्या आरोपीस अटक

रमेश असे या आरोपीचे नाव असून त्याचा कपड्याचा व्यवसाय आहे.
Minor Girl Molestation
Minor Girl Molestationfile photo
Published on
Updated on

मुंबई: आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २२ वर्षांच्या आरोपी तरुणाला जोगेश्‍वरी पोलिसांनी अटक केली.

रमेश असे या आरोपीचे नाव असून त्याचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Minor Girl Molestation
Uniform Delay: पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा पहिला महिना जुन्‍या गणवेशात; शालेय वस्तूंचे वाटप लांबणीवर

३३ वर्षांचे तक्रारदार जोगेश्‍वरी येथे राहत असून बळीत आठ वर्षांची त्यांची मुलगी आहे. रविवारी ७ जूनला रात्री साडेदहा वाजता त्यांची मुलगी शिवलिला हॉटेलच्या दिशेने जात होती. जोगेश्‍वरीतील स्टेशन रोड, इस्माईल युसूफ कॉलेज गेटसमोरुन जात असताना आरोपीने पाठलाग करुन मागून नकोसा अश्‍लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता.

हा प्रकार नंतर तिने तिच्या पित्याला सांगितल्यानंतर त्यांनी जोगेश्‍वरी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

Minor Girl Molestation
Konkan Monsoon Birds: शेतकऱ्यांचे मित्र! कोकणातील पावसाळी पक्षी

त्याला रात्री उशिरा त्याच्या राहत्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दिडोंशीतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news