

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा ८२ टक्केवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्याने म्हणजे दीड लाख दशलक्ष लिटरने पाणीसाठा कमी आहे. मोडक सागर तलावातील पाणीसाठा ५० टक्के पेक्षा खाली आला आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्ये यंदा कमी पाऊस झाला. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात सुरू आहे. तलावातील पाण्याच्या साठ्यात होणारी घट लक्षात घेता, पाणी कपातील वाढ केल्याशिवाय पालिकेकडे पर्याय उरणार नाही. सोमवार ९ नोव्हेंबर सकाळी सहा वाजेपर्यंत सातही तलाव क्षेत्रामध्ये ८२ टक्के म्हणजे ११ लाख ८७ हजार ४६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. शहराला सर्वाधिक दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावामध्ये ८५ टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ टक्के म्हणजे सुमारे ६८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे.
अन्य तलावातील पाणीसाठा ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून मोडक सागरचा पाणीसाठा ४९ टक्केवर आला आहे. गेल्या वर्षी या तलावात ८० टक्के पाणीसाठा होता. तानसा तलावातील पाणीसाठाही १३ टक्केने घसरला आहे.
अन्य तलावातील पाणीसाठा ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून मोडक सागरचा पाणीसाठा ४९ टक्केवर आला आहे. गेल्या वर्षी या तलावात ८० टक्के पाणीसाठा होता. तानसा तलावातील पाणीसाठाही १३ टक्केने घसरला आहे.