Mumbai Water Stock 2026 : पाणीसाठ्यात घट; मुंबईकरांवर टंचाईचे सावट

जलाशयांची पातळी घटली; मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ८ टक्के कमी पाणीसाठा
Mumbai Water Stock 2026
Mumbai Water Stock 2026pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : राजेश सावंत

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने पाणीसाठा ८७ टक्केवर पोहचला आहे. यात मोडक सागर तलावातील पाणीसाठा ५० टक्केवर आला आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत तलावांमध्ये ८ टक्के म्हणजेच सरासरी महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा कमी आहे.

तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तलावातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. २०२४ व २०२५ मध्ये २७ ऑक्टोबरपर्यंत ९५ टक्के म्हणजे सरासरी १३ लाख ७७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता.

Mumbai Water Stock 2026
Sahil Wakode Death Case : साहिलच्या मृत्‍यूप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

यावेळी हा पाणीसाठा ८७ टक्केवर म्हणजेच १२ लाख ५९ हजार दशलक्ष लिटर इतका असून तो मागील दोन वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्याने कमी आहे. मोडक सागर तलावातील पाणीसाठा २०२५ मध्ये २७ ऑक्टोबरला ८० टक्के इतका होता. यावेळी तो ५० टक्केवर आला आहे. अन्य तलावातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

दररोज साडेचार हजार दशलक्ष लिटर पाण्यामध्ये घट

मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू असल्यामुळे दररोज ३ हजार ६५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्याशिवाय भिवंडी व ठाणे जिल्ह्यातील काही गावांना या तलावातून १५० ते २०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. तर बाष्पीभवनामुळे उर्वरित पाणी वाया जात असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले. तलावातील पाणीसाठ्यामध्ये दररोज सुमारे साडेचार हजार दशलक्ष लिटर घट होत आहे.

Mumbai Water Stock 2026
Custodial Death Compensation | कोठडी मृत्यू : पाच लाखांची भरपाई

पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याचे पालिकेसमोर आव्हान

  • शहराला दररोज २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठाही गेल्यावर्षीच्या तुलनेत ५ टक्क्याने कमी आहे. तानसा तलावातील पाणीसाठाही सुमारे १२ टक्केने कमी आहे.

  • मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये असलेले तुळशी व विहार हे छोटे तलाव शंभर टक्के भरलेले असताना, या तलावातील पाणीसाठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्याने कमी आहे. त्यामुळे सध्याचा पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी महापालिकेसमोर आव्हान आहे.

एकूण पाणीसाठ्यात घट

  • २७ ऑक्टोबर २०२४- १३,८८,८५९ (९५.९६ टक्के)

  • २७ ऑक्टोबर २०२५ - १३,७७,८८६ (९५.२० टक्के)

  • २७ ऑक्टोबर २०२६ - १२,५९,७९१ (८७.०४ टक्के)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news