Mumbai Water Crisis : मुंबईत पुढील आठवड्यात खडखडाट

वैतरणा जलवाहिनीवर दुरुस्ती : मुलुंड, भांडुपसह ठाणे शहरात दोन दिवस पाणी नाही
Mumbai water crisis
मुंबईत पुढील आठवड्यात खडखडाटpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : जलवाहिन्या स्थलांतरण आणि दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेन हाती घेतल्याने पालिकेने 24 तासांचा शटडाऊन घेतला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दोन दिवस ‌‘एस‌’ व ‌‘टी‌’ विभागातील मुलुंड, भांडुपसह ठाणे शहरातील काही भागांमध्ये या काळात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मंगळवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील 2,400 मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जलजोडण्या या 2,750 मिलीमीटर व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्यात येणार आहेत तसेच भांडुप (पश्चिम) येथील खिंडीपाडा परिसरातील 2400 मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीस लोखंडी झाकण बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

Mumbai water crisis
Scam Accused Death : कोट्यवधी रुपयांच्या भात खरेदी घोटाळ्यातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Mumbai water crisis
Badlapur Crime : बदलापूरमधील चिमुकलीवर अतिप्रसंग

या विभागांतील पाणीपुरवठा राहणार बंद

‌‘एस‌’ विभाग (भांडुप पश्चिम)

खिंडिपाडा अ, लोअर खिंडिपाडा ब, अप्पर खिंडीपाडा (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 5.00 ते सायंकाळी 5.00) तर मंगळवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.

‌‘ठाणे शहर‌’ विभाग

किसन नगर (पूर्व), किसन नगर (पश्चिम), भटवाडी (नियमित पाणीपुरवठा 24 तास) तर मंगळवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहिल.

‌‘टी‌’ विभाग (मुलुंड पश्चिम )

अमर नगर, गरखाचाळ, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, मुलुंड वसाहत, मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग, वैशालीनगर, घाटीपाडा व गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम) (नियमित पाणीपुरवठा साधारण 18 तास) तर मंगळवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहिल.

मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवी दयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग) मार्ग, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजीलाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदनमोहन मालविय मार्ग, ए. सी. सी. मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुरगाव.

(नियमित पाणीपुरवठा 24 तास) तर मंगळवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news