Mumbai Water Cut: मुंबईकर पाणीटंचाईने हैराण; दहा टक्के कपातीचा फटका

पिसे येथील परिरक्षण कामामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
Mumbai Water Cut
Mumbai Water CutPudhari
Published on
Updated on

मुंबई : पिसे येथील ‌‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम‌’चे वार्षिक परिरक्षणाचे काम 27 जानेवारीपासून हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक मुंबईत पाण्याची टंचाई भासत असून नागरिक त्रस्त आहेत. हा त्रास 7 फेब्रुवारीपर्यंत सहन करावा लागणार आहे.

Mumbai Water Cut
Konkan Koliwada survey: कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी होणार अधिकृत! सर्वेक्षण आणि सीमांकनासाठी समिती गठीत

जलवाहिन्या फुटणे, विविध मेंटेनन्सचे काम व अन्य कामासाठी अधून-मधून शहरात पाणीकपात लागू करण्यात येते. त्यामुळे मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शहर विभाग व पूर्व उपनगरांतील बहुतेक भागात पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयात आल्या आहेत. त्यामुळे काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

Mumbai Water Cut
Shiv Sena BMC office issue: शिंदेंच्या शिवसेनेला पालिकेतील पक्ष कार्यालय गमावण्याची शक्यता

महापालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली असली तरी प्रत्यक्षात ही कपात 20 ते 25 टक्केपर्यंत जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रोजच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे एक दशलक्ष लिटर पाण्याची कपात झाली आहे. शहराला दररोज सुमारे 4 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र सध्या तो 3 हजार दशलक्ष लिटर इतका होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कपातीमुळे जलाशयापासून दूर असलेल्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पोचत आहे. त्यामुळे पाण्याचे वितरण करताना काही भागात कमी-जास्त प्रमाणात पाणी मिळत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Water Cut
Aided school staff Maharashtra: अनुदानित शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा नोकरीची नवी सर्वसमावेशक योजना लागू

पिसे येथील ‌‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम‌’चे वार्षिक परिरक्षणाचे काम 27 जानेवारीपासून हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक मुंबईत पाण्याची टंचाई भासत असून नागरिक त्रस्त आहेत. हा त्रास 7 फेब्रुवारीपर्यंत सहन करावा लागणार आहे.

जलवाहिन्या फुटणे, विविध मेंटेनन्सचे काम व अन्य कामासाठी अधून-मधून शहरात पाणीकपात लागू करण्यात येते. त्यामुळे मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या शहर विभाग व पूर्व उपनगरांतील बहुतेक भागात पाणीटंचाईची झळ पोहचत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयात आल्या आहेत. त्यामुळे काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

Mumbai Water Cut
Ajit Pawar death: अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादीने प्रचार थांबवला; जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठे अपडेट

महापालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली असली तरी प्रत्यक्षात ही कपात 20 ते 25 टक्केपर्यंत जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रोजच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुमारे एक दशलक्ष लिटर पाण्याची कपात झाली आहे. शहराला दररोज सुमारे 4 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र सध्या तो 3 हजार दशलक्ष लिटर इतका होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कपातीमुळे जलाशयापासून दूर असलेल्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पोचत आहे. त्यामुळे पाण्याचे वितरण करताना काही भागात कमी-जास्त प्रमाणात पाणी मिळत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai Water Cut
Pinky Mali flight accident: पिंकी माळी यांना वरळीत अखेरचा निरोप

या भागात पाणीटंचाई

शहर

ए विभाग : नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र

बी विभाग : संपूर्ण विभाग

सी विभाग : भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला क्षेत्र

ई विभाग : पूर्ण विभाग

एफ दक्षिण विभाग :

संपूर्ण विभाग

एफ उत्तर विभाग : संपूर्ण विभाग

Mumbai Water Cut
NCP ZP Elections: झेडपी निवडणुकांनंतर राष्ट्रवादीचे विलीनीकरण?

पूर्व उपनगरे

टी विभाग : मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र

एस विभाग : भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र

एन विभाग : विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर

एल विभाग : कुर्ला (पूर्व) क्षेत्र

एम पूर्व विभाग : संपूर्ण विभाग

एम पश्चिम विभाग : संपूर्ण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news