Mumbai Water Cut Alert: मुंबईत २६, २७ नोव्हेंबरला २४ तास पाणीकपात; धारावी, वांद्रे पूर्वसह अनेक भागांवर परिणाम

पवई जलाशय ते सहारदरम्यान मुख्य जलवाहिनीची २४ तास दुरुस्ती; काही भागांत पाणी पूर्ण बंद तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा
Mumbai Water Cut
Mumbai Water CutPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: एकीकडे दुष्काळामुळे मुंबईवरील पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना आता गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक १ ते सहार गाव दरम्यानच्या मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने २४ तासांची दुरुस्ती मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणारे काम शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत चालणार आहे.

Mumbai Water Cut
ED Raid: रॉयल ट्विंकल, सिट्रसच्या ५५६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीची टाच; गुंतवणूकदारांकडून ८,८५२ कोटी गोळा केल्याचा आरोप

या कालावधीत जी उत्तर, के दक्षिण, के उत्तर, एच पूर्व आणि एस विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, काही भागांत कमी दाबाने पाणी मिळणार आहे. काही विभागांमध्ये पाणी पूर्णपणे बंद नसले तरी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.

मुंबई महापालिकेने मुख्य जलवाहिन्यांवरील गळती रोखण्यासाठी हाती घेतलेल्या या दुरुस्ती कामामुळे धारावी, मरोळ, अंधेरी, सहार, वांद्रे पूर्व, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि आसपासच्या परिसरांतील नागरिकांना पाणीपुरवठ्याचा फटका बसणार आहे.

Mumbai Water Cut
Prakash Abitkar: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांसाठी आरोग्यमंत्र्यांचा पुढाकार; समिती गठित

त्यामुळे नागरिकांनी आधीच वापरण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने तसेच काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकरांना करण्यात आले आहे.

दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही पुढील तीन ते चार दिवस काही भागांत कमी दाबाने तसेच गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून आणि उकळूनच वापरावे, असे आवाहनही मुंबई महापालिका प्रशासनाने नागरीकांना केले आहे.

नागरिकांसाठी सूचना

  • २६ नोव्हेंबरपूर्वी आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवा.

  • दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा जपून वापर करा.

  • दुरुस्तीनंतर पुढील ३ ते ४ दिवस कमी दाबाने आणि गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे.

  • खबरदारी म्हणून पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे भाग

एन विभाग (विक्रोळी, घाटकोपर परिसर) - अप्पर डेपो पाडा, लोअर डेपो पाडा, सागर नगर, महानगरपालिका इमारत विभाग, विक्रोळी पश्चिम रेल्वे स्टेशन मार्ग, फिरोजशाह नगर, गोदरेज कुंपण, मेफेअर इमारती, कैलास संकुल, वाधवा निवासी, प्रेसिडेंशियल टॉवर्स, कल्पतरू संकुल, आर-सिटी मॉल, संघानी इस्टेट, श्रेयस सिनेमा, साईनाथ नगर, नित्यानंद नगर.

पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणारे भाग

जी उत्तर विभाग (धारावी, माहीम, माटुंगा परिसर) - धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, प्रेम नगर, नाईक नगर. धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जास्मिन मिल मार्ग, माहीम फाटक, कुंभारवाडा. माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० व ९० फुटी रस्ता, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, महात्मा गांधी मार्ग.

के दक्षिण व के उत्तर विभाग (अंधेरी, मरोळ, सहार परिसर) - विजय नगर मरोळ, मिलिटरी मार्ग, वसंत ओअसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा, सेव्हेन हिल्स रुग्णालय, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिप्झ, मुलगाव डोंगरी, एमआयडीसी मार्ग क्रमांक १ ते २३, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ वसाहत, ओम नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर, सहार गाव, सुतारपाखाडी, कार्गो संकुल.

एच पूर्व विभाग- (वांद्रे पूर्व परिसर) वांद्रे टर्मिनस, ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहरामपाडा, खेरनगर, निर्मल नगर, वांद्रे पूर्व.

एस विभाग (विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप परिसर)- मोरारजी नगर, गौतम नगर, जय भीम नगर, पासपोली गाव, कैलास नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, स्काऊट गाईड, पालिका कर्मचारी वसाहत, ठाणवाडी.

एस विभाग (विक्रोळी पश्चिम, कांजूरमार्ग पश्चिम)- विक्रोळी पश्चिम, कांजूरमार्ग पश्चिम, सूर्या नगर, आंबेडकर चौक, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सनसिटी संकुल, भांडुप पश्चिम – महाराष्ट्र नगर, कोकण नगर, समर्थ नगर, काजू टेकडी, क्वॉरी मार्ग, जमील नगर, उत्कर्ष नगर, साई हिल, साई विहार, टेंभीपाडा, भट्टीपाडा, टँक मार्ग, जनता बाजार, लेक मार्ग, तुळशेतपाडा, गाव मार्ग, दत्त मंदिर मार्ग, शास्त्री नगर, सोनापूर, श्रीरामपाडा, त्रिमूर्ती नगर, आंब्याची भरणी, वाघोबा वाडी, तानाजी वाडी, नरदास नगर, शिवाजी नगर, तानाजीवाडी, चाफ्याचा पाडा, डक्ट लाईन मार्ग, रामनगर, रमाबाई नगर, हनुमान नगर, पानसरे कुंपण, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, फुले नगर, मुत्तू कुंपण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.