Mumbai water crisis : अंधेरी, सांताक्रूझ, दादरमध्ये पाणीकपात

काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे
Mumbai water crisis
अंधेरी, सांताक्रूझ, दादरमध्ये पाणीकपातpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : 28 तासानंतर मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोच महापालिकेने तिसऱ्या मोठ्या शटडाऊनची घोषणा केली आहे. मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीच्या कामांसाठी शुक्रवार 12 डिसेंबर सकाळी 9 ते शनिवार 13 डिसेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत अंधेरी, सांताक्रुझ, दादरमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

अंधेरी के पूर्व, सांताक्रुझ एच पूर्व व दादर जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची 1800 मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, 2400 मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Mumbai water crisis
Desalination project : खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प दहा हजार कोटींवर

याची सुरुवात शुक्रवारपासून होणार असल्याने अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, बांद्रा पूर्वेकडील भागासह धारावी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे तर खबरदारी उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Mumbai water crisis
Mumbai crime: महाराष्ट्र हादरला! १६ वर्षीय मुलाने 'ती' गोळी खाल्ली अन् चिमुरडीवर अत्याचार केला; रक्तस्राव थांबेना म्हणून...

शुक्रवारी पाणी कुठे येणार नाही ?

  • ‌‘जी उत्तर‌’ विभाग : धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर धारावी सायंकाळचा पाणीपुरवठा - धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर.

  • के पूर्व विभाग : विजय नगर मरोळ, मिलीट्री रोड, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रस्ता, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा. आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक 1 ते 23, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज, चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजीनगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत.

  • एच पूर्व विभाग : संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) विभाग, मोतिलाल नगर.

  • कमी दाबाने पाणीपुरवठा : कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरपाडा.

शनिवारी पाणी कुठे येणार नाही ?

  • ‌‘जी उत्तर‌’ विभाग : धारावी सकाळचा पाणीपुरवठा - जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, 60 फूट मार्ग, 90 फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, महात्मा गांधी मार्ग.

  • के पूर्व विभाग : ओमनगर, कांतीनगर, राजस्थान वसाहत, साईनगर (तांत्रिकक्षेत्र) सहारगाव, सुतारपाखडी (पाईपलाईनक्षेत्र).

  • संपूर्ण वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) विभाग: मोतिलाल नगर.

  • एच पूर्व विभाग : प्रभात वसाहत, टिस-3, आग्रीपाडा, कालीन, सीएसटी मार्ग हंसबुरगा मार्ग, विद्यापीठ , सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोळीवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news