Mumbai University admission registration: एफवाय प्रवेशनोंदणीस 2 दिवसांची मुदतवाढ; 23 मेपर्यंत करता येणार ऑनलाईन नावनोंदणी

26 तारखेला पहिली गुणवत्ता यादी होणार जाहीर
Mumbai University admission registration
Mumbai University admission registrationPudhari
Published on
Updated on

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी पदवीच्या 3 आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकाप्रमाणे आता विद्यार्थ्यांना 23 मे 2026 पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म सादर करणे आणि इन हाऊस ॲडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.

Mumbai University admission registration
Maharashtra Politics: शेतकऱ्यांना साठेबाज ठरवून सरकारची ‌‘सर्कस‌’ सुरू; अंबादास दानवे यांची टीका

तथापि मुंबई विद्यापीठाने यापूर्वी पदवी प्रवेशासाठी निर्गमित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय गुणवत्ता यादी आणि अनुषंगिक प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व महाराष्ट्र शासनाच्या 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयानुसार 3 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, 4 वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, 5 वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या https://muugadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news