Mumbai Traffic: वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर विधानसभेत संताप; मुंबईत चक्का जामचा इशारा

ई-चलानमुळे वाहनचालकांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित; आमदार अमीन पटेल यांची सरकारकडे तातडीच्या तोडग्याची मागणी
 Vidhan Parishad
Vidhan Parishadfile photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यभरात वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार अमीन पटेल, हारून खान यांच्यासह अनेक आमदारांनी यासंदर्भात राज्य सरकारला तातडीने याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली. पटेल यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव सूचना मांडली त्यावर विधानसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला याप्रकरणी गंभीर दखल घेत कार्यवाही करण्याची सूचना केली.

 Vidhan Parishad
Mira Bhayander Municipal Corporation: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी हसमुख गेहलोत; महिला-बालकल्याण समितीत भाजपचा दबदबा

यावेळी अमीन पटेल म्हणाले की, महाराष्ट्र वाहतूक कृती समितीकडून राज्य सरकारला देण्यात आलेल्या निवेदनात मुंबईत चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारकडून 2017 रोजी ई चलान ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तीन फोटो आणि पुरावा असणे अनिवार्य आहे. 90 दिवसांच्या आत पुरावा

 Vidhan Parishad
Plastic Free Mumbai: प्लास्टिकमुक्त मुंबईसाठी महापालिकेची पुन्हा मोहीम; दुकानदारांवर ५ ते २५ हजारांचा दंड

न मिळाल्यास हे चलान रद्द करण्याचा निर्णय आहे. मात्र त्यानंतरही सरार्सपणे कारवाई सुरु आहे. आज अनेक गाड्यावर लाखो रुपयांचा दंड आहे. 4 हजार 500 करोड रुपयांचे चलन प्रलंबित असून त्यापैकी 3 हजार 500 कोटींचे चलन हे व्यावसायिक वाहनांवर असून उर्वारित 1 हजार कोटी दंड खासगी वाहनांवर आहेत. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याबाबत अमीन पटेल यांनी लक्ष वेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news