Tomtom Traffic Index 2026 Mumbai Pune bengaluru Ranking
मुंबई / पुणे : जगभरातील शहरांमधील वाहतूक स्थितीचा आढावा घेणाऱ्या प्रसिद्ध टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सचा 2025 चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात बंगळरू जगात दुसऱ्या, तर पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर आले आहे. मुंबई शहरही या यादीत असून ते 18 व्या क्रमांकावर आहे.
टॉम टॉम टॉम टॉम संस्थेच्या अहवालानुसार, जगातील 492 शहरांतील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पहिला क्रमांक मेक्सिको सिटी, दुसरा बंगळूर, तिसरा डब्लिन, चौथा लॉर्डस् आणि पाचवा क्रमांक पुण्याचा लागत आहे. 2024 च्या अहवालात पुण्याचा चौथा क्रमांक लागत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा क्रमांक पाचवर गेला आहे.
मुंंबईचा 18 वा आणि देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा 23 वा क्रमांक लागला आहे. या अहवालामुळे वाहतूक कोंडीसंदर्भात पुणे प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी काळात प्रशासन याकरिता काय प्रयत्न करणार, हे आता पाहावे लागेल. मुंबईतही वाहतूक कोंडी ही समस्या या यादीत असल्याने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
संस्थेच्या अहवालानुसार, जगातील 492 शहरांतील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पहिला क्रमांक मेक्सिको सिटी, दुसरा बंगळूर, तिसरा डब्लिन, चौथा लॉर्डस् आणि पाचवा क्रमांक पुण्याचा लागत आहे. 2024 च्या अहवालात पुण्याचा चौथा क्रमांक लागत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा क्रमांक पाचवर गेला आहे.
मुंंबईचा 18 वा आणि देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा 23 वा क्रमांक लागला आहे. या अहवालामुळे वाहतूक कोंडीसंदर्भात पुणे प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी काळात प्रशासन याकरिता काय प्रयत्न करणार, हे आता पाहावे लागेल. मुंबईतही वाहतूक कोंडी ही समस्या या यादीत असल्याने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
वाहतूक कोंडीत ही शहरे आघाडीवर
देशातील वाहतूक कोंडीत प्रथम बंगळूर, दुसरे पुणे, तिसरे मुंबई, चौथे नवी दिल्ली, पाचवे कोलकाता, सहावे जयपूर, सातवे चेन्नई, आठवे हैदराबाद, नववे एर्नाकुलम, दहावा क्रमांक अहमदाबादचा लागत असल्याचे ‘टॉम टॉम’ अहवालातून समोर आले आहे.