मुंबई : लालबागच्या राजाची पहिली झलक! मुख दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी

मुंबई : लालबागच्या राजाची पहिली झलक! मुख दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा कायमच भाविकांसाठी श्रद्धास्थान असतो. लालबागचा राजा गणेशाच्या यंदाच्या मूर्तीचे सोमवारी (दि.२९) सायंकाळी मुखदर्शन सोहळा पार पडला. त्यानंतर गणेश मुर्तींचे मुखदर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी रांगा लावल्या होत्या. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर भाविकांमध्ये उत्साह, आनंदमय व चैतन्याचे वातावरण होते.

यंदा लालबागचा राजाला राम मंदिराच्या देखाव्यात विराजमान करण्यात आले आहे. यावेळी सेल्फी घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. 'लालबागचा राजा'ची ख्याती सर्वत्र पसरलेली असल्याने मुखदर्शनाच्या वेळी भाविकांची अलोट गर्दी होती. ठरलेल्या वेळेनुसार यंदाच्या लालबागचा राजाच्या मूर्तीवरून पडदा बाजूला करण्यात आला. त्यानंतर गणेश भक्तांनी गणपती-बाप्पा मोरया असा एकच जयघोष केला.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी यंदाच्या लालबागचा राजा गणेश भक्तांसाठी डोळ्याचे पारणे फेडेल असा देखावा केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं रुप कसे असेल याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता होती.

यावर्षी अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. उद्या, बुधवार (दि.३१) पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी; दोन दिवस अगोदर लालबागच्या राजाची विशेष गणेश मूर्ती मंडपात विराजमान झाली. मुखदर्शन सोहळयापूर्वी मुर्तीवरील पडदा उघडताना भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, विरार आदी भागांतून भाविक दर्शनासाठी आले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news