Mumbai Stray Pigs: मुंबईकरांना आता भटक्या कुत्र्यांसोबत डुकरांचाही त्रास; ३ ते ४ हजार डुकरांचा वावर

शहर व उपनगरांतील उकिरडे, गलिच्छ भागात डुकरांचा सर्वाधिक वावर
Mumbai Stray Pigs
Mumbai Stray PigsPudhari
Published on
Updated on

राजेश सावंत

मुंबई: भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. पण मुंबईकरांना भटक्या डुकरांचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. झाडेझुडपे, उकिरडा व गलिच्छ भागात डुकरांचा सर्वाधिक वावर असून ही संख्या ३ ते ४ हजारपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई शहरातील भटक्या डुकरांची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली असली तरी, आजही गलिच्छ भाग, झाडे झुडपे, शौचालय परिसर, कचऱ्याचा ढीग असलेला ठिकाण येथे मोठ्या प्रमाणात डुकरांचा वावर दिसून येतो.

Mumbai Stray Pigs
NSE IPO Valuation: एनएसईचे मूल्यांकन ५५ अब्ज डॉलर!आयपीओनंतर होणार जगातील सहावा मोठा शेअर बाजार

रात्रीच्या वेळी भर लोकवस्तीत अचानक १५ ते २० डुक्कर असलेला कळप लोक वस्तीमध्ये घुसतो. डुकरांना पळवण्याचा प्रयत्न केल्यास काही डुक्कर अंगावर धावून येतात. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री फिरावे लागत आहे.

डुकरांचा उपद्रव थांबवण्यासाठी महापालिकेकडून डुक्कर पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तक्रारीनंतरच डुकरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्यात येते.

काही दिवसांपूर्वी गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाम परिसरात ३० ते ३५ भटक्या डुकरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. कळपाने भर वस्तीमध्ये धावत येणे, अंगावर धावून जाणे, या घटनांमध्ये वाढ झाली होती. चिखलाने माखलेल्या या डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी रहिवाशांनी महापालिकेकडे विनंती केली.

अखेर महापालिकेच्या देवनार कत्तलखान्या अंतर्गत येणाऱ्या मोकाट डुकरांना पकडण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी १६ ते १७ डुकरांना सापळा लावून पकडण्यात आले. पण काही डुक्कर पळून गेल्यामुळे त्यांना पकडणे शक्य झाले नाही. देवनार परिसरात अलीकडेच उपद्रवी ७ ते ८ डुकरांना पकडण्यात आले. अशा प्रकारची मोहीम नागरिकांच्या तक्रारीनुसार वेगवेगळ्या भागात सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

Mumbai Stray Pigs
FDA Action: राज्यात एफडीएची धडक कारवाई; गुटखा-पानमसाला प्रकरणात १० जणांना अटक

लपून बसलेल्या डुकरांना पकडणे अशक्य

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डुकरांचा वावर दिसून येतो. पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी झालेला चिखल, उकिरडा, गलिच्छ भाग उदाहरणार्थ झाडाझुडपांमध्ये भटक्या डुकरांचे वास्तव्याचे ठिकाण असते. आपल्याला पकडणारी याचा अंदाज येताच डुकर चिखलात किंवा झाडाझुडपात घुसतात. अनेक तास ती बाहेर येत नाहीत त्यामुळे त्यांना पकडणे शक्य होत नाही. यासाठी त्या भागात काही दिवस सापळे लावून डुकर पकडण्याची मोहीम राबवण्यात येते.

डुक्कर पकडण्यासाठी दोन वाहने

डुकर पकडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची दोन वाहने असून चार ते पाच जणांची एक टीम आहे. या टीमकडे सापळा लावण्यासाठी विशिष्ट नायलॉन जाळी असते. ही जाळी डुक्कर असलेल्या भागात लावण्यात येते. त्यानंतर लपलेल्या डुकरांना हाकलवण्यात येते. त्यामुळे डुकर या जाळीमध्ये फसले जातात.

येथे तक्रार करा

मुंबई महापालिका टोल फ्री क्रमांक - १९१६

संबंधित विभाग कार्यालय

या भागात भटक्या डुकरांचा वावर

  • देवनार

  • गोवंडी

  • शिवाजीनगर

  • बैंगनवाडी

  • मानखुर्द

  • कुर्ला

  • बांद्रा पूर्व

  • गोरेगाव पूर्व

  • मालाड

  • पवई

  • मालवणी

  • दहिसर

  • मढ

  • मार्वे

तक्रार आल्यानंतरच डुक्कर पकडण्यासाठी सापळा रचण्यात येतो. जून पासून आतापर्यंत गोरेगाव सह देवनार गोवंडी आदी भागात सापळे लावून ३० पेक्षा जास्त डुकरांना पकडण्यात आले. यापुढे जसजशा तक्रारी येथील तशा मोहीमही राबवण्यात येतील.

- नागेश बांदेकर, कोंडवाडा अधिकारी, मुंबई महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news