Mumbai Air Pollution : धूळ प्रदूषणाने मुंबईवर दाट धुके

मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बाधकामांचा परिणाम
Mumbai Air Pollution
Mumbai Air Pollutionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईवर १८ ऑक्टोबर रोजी दाट धुरक्याचे (स्मॉग) आवरण पाहायला मिळाले. शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून धुक्याची चादर ओढली गेली, असे सर्वांना वाटत आहे. मात्र, त्यामागील मुख्य कारण वेगळे आहे.

रीडिंग रूम इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वातावरणीय आकडेवारीनुसार, मिक्सिंग लेअरमध्ये अचानक झालेली घट, कमी झालेला व्हेंटिलेशन रेट आणि थंडावलेले सागरी वारे ही वातावरणीय आणि भौगोलिक कारणे प्रामुख्याने कारणीभूत होती.

Mumbai Air Pollution
Palghar Accident : आश्रमशाळेतील तीन विध्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

मिक्सिंग लेअरमध्ये अचानक वरचा थर अचानक २५ मीटरपर्यंत खाली आला. यामुळे हवेतील प्रदूषक घटक वरच्या वातावरणात पसरण्याऐवजी जमिनीलगतच कोंडले गेले. हवेचा वेग आणि तिचा बदलण्याचा दर खालावल्यामुळे प्रदूषकांना वाहून नेण्यासाठी पुरेसा वारा उपलब्ध नव्हता. मान्सूनच्या परतीनंतर समुद्रावरून येणारे वारे संथ किंवा स्थिर झाले होते.

मुंबईमध्ये प्रदूषण नैसर्गिकरित्या वाहून नेण्यासाठी हे वारे मोठी भूमिका बजावतात, परंतु तेच थांबल्यामुळे शहरात आधीपासून अस्तित्वात असलेले पीएम २.५चे उत्सर्जन एकाच ठिकाणी साचून राहिले आणि त्याने दाट धुरक्याचे थर तयार झाले.

Mumbai Air Pollution
Ganesh Naik : पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार शेवटपर्यंत राहणार - गणेश नाईक

थोडक्यात सांगायचे तर, हवेची अंतर्गत हालचाल मंदावणे आणि प्रतिकूल हवामान यामुळे मुंबईतील स्थानिक प्रदूषण एकाच जागेवर साठून राहिल्याने हा धुराचा थर पसरला होता.

तापमानात पुन्हा वाढ; पारा पस्तीशीपार

गेले दोन दिवस मुंबईतील तापमानात मोठा चढउतार दिसून येत आहे. सांताक्रुझ वेधशाळेच्या साप्ताहिक फोरकास्टनुसार रविवारी किमान २७ आणि कमाल ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, सोमवारी (२६/३६ अंश सेल्सिअस) कमाल तापमानात दोन अंशांनी वाढ झाली. पुढील दोन दिवस याच तापमानाची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. मात्र, गुरुवारपासून (३७ अंश सेल्सिअस) आणखी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news