Sion Dharavi Flyover Inauguration: सायन-धारावी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन; सायन पूल चार महिने आधी पूर्ण, बेस्ट बस मार्गही पूर्ववत होणार
Sion Dharavi Flyover Inauguration
Sion Dharavi Flyover InaugurationPudhari
Published on: 
Updated on: 

धारावी: मुंबईतील बहुप्रतिक्षित शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता ऑनलाईन (व्हर्च्युअल) पद्धतीने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

हा पूल फेब्रुवारी २०२७ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु मुंबई महापालिका आणि रेल्वेच्या उत्कृष्ट समन्वयामुळे विविध अडचणींवर मात करत हे काम मुदतीपेक्षा चार महिने आधीच पूर्ण करण्यात आले आहे.

Sion Dharavi Flyover Inauguration
Kopri Lake Incident: कोपरी तलावात बुडून २ चिमुरड्यांचा मृत्यू; दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा रुग्णालयात गोंधळ

मुंबईतील तीन महत्वांच्या उड्डाणपूलांचे काम पुर्ण होवून काही महिने उलटलेली असतांना, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून उद्दघाटन करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र अखेर मुंबईतील शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यास मुहूर्त मिळाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या तिन्ही उड्डाणपुलाचे होणार आहे. महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी असतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संबंधित उड्डाणपुलांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

Sion Dharavi Flyover Inauguration
Maharashtra Politics: मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या आरोपावरून राजकारण तापले; उदय सामंत म्हणाले, पुरावे देणार

या सोहळ्यास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उपमहापौर संजय घाडी हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुन्हा धावणार बेस्ट बसेस !

हा पूल सुरू झाल्यास मुंबईतील बेस्ट बससेवेच्या मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. उड्डाणपुलाच्या कामामुळे खंडित करण्यात आलेले अनेक बस मार्ग पुन्हा पूर्ववत होणार आहेत.

वाहतुकीतील अडथळे आणि पर्यायी मार्गांचा विचार करून काही बस मार्गांमध्ये बदल करण्यात आले, तर काही मार्गांचे विस्तारीकरण किंवा खंडितीकरण करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news