Sindhudurg - Mumbai Flight Schedule | मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता सातही दिवस !

Chipi Airport Flight Schedule | १०० टक्के व्हीजीएफ सुविधेला मंत्रिमंडळाची मंजुरी : पालकमंत्र्यांची माहिती
Chipi Airport Flight Schedule
Chipi Airport Flight Schedule pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गवासीय आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे,

Chipi Airport Flight Schedule
Sphatik Shivling Controversy | कथित स्फटीक शिवलिंगाविरोधात वराड ग्रामस्थ एकवटले

अशी महत्त्वपूर्ण माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. देश-विदेशातील पर्यटक येथील पर्यटन अनुभवण्यासाठी येत असतात. मात्र सिंधुदुर्ग - मुंबई विमान सेवा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होत होता.

आता शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खाजगी चालकांना याचा मोठा फायदा होईल. मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होईल. सण-उत्सव काळात चाकरमान्यांना आता प्रवासाचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध असेल.

Chipi Airport Flight Schedule
Maharashtra and Goa Election 2026 | अॅड. असीम सरोदे यांचे आरोप बिनबुडाचे

तसेच तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चिपी विमानतळावरील विमानसेवेच्या विस्कळीतपणामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. ही सेवा नियमित व्हावी यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांनी सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केल्याने पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news