

मालवण : पुढारी वृत्तसेवा
मालवण तालुक्यातील वराड गावच्या हद्दीत सावरवाड येथे रुद्रनाथ फाउंडेशन यांनी स्थापन केलेल्या कथित स्फटिक शिवलिंगा विरोधात वराड ग्रामस्थांचा विरोध तीव्र झाला आहे. रविवारी सायंकाळी वराडचे ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर प्रांगणात या संदर्भात सभा घेण्यात आली. या सभेला ४०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
स्फटिक शिवलिंग परिसरात अघोरी प्रकार होत असून हे प्रकार कोकणातील गावहऱ्हाटीला मान्य होणारे नाहीत. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नसून, तुमचे हे दुकान लवकरात लवकर येथून हलवून गावच्या वेशी बाहेर न्या, प्रशासनाने ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन येथील अघोरी प्रकार थांबवावेत अन्यथा सनदशीर मार्गान आंदोलन छेडण्याचा इशारा या गाव बैठकीतून देण्यात आला.
या जनआक्रोश सभेला सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी, गावचे सर्व मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यात प्रामुख्याने शिवसेनेचे कुडाळ-मालवण निरीक्षक बाळा चिंदरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्ट्स, अॅड. रुपेश परुळेकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल परब, सचिन परब, सुनील आळवे, तुकाराम परब, गुरुनाथ सामंत, अमित फाटक, देवेन भोगटे, बबन पांचाळ, श्यामसुंदर वराडकर, सुरेश चव्हाण, दिनकर पांचाळ, सोनल माळी, मीनल माळी, शिवानी आळवे, शिवराम वराडकर, रवींद्र परब, सुभाष सारंग, परशुराम घाडी, अशोक परब, सुशील आचरेकर, मैथिली पेडणेकर, सुनीता सावंत आदींसह अन्य शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत वराड गावच्या हद्दीतून हे स्फटिक शिवलिंग हटवण्यासाठी वेळप्रसंगी सनदशीर मागनि लढा उभारण्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला. आमच्या विरोध अनधिकृत आणि अघोरी कृत्यांना अॅड रुपेश परुळेकर अॅड. रुपेश परुळेकर म्हणाले, सावरवाड गावात सात ते आठ व्यक्तीनी येऊन चुकीच्या काही गोष्टी सुरु केल्या.
त्यावेळी रुद्रनाथ फाउंडेशन हे नाव पुढे आणलं. त्यांनी महाशिवरात्रीला आशिया खंडातलं वायव्यमुखी शिवलिंग आम्ही येथे आणलं अशा प्रकारची जाहिरात केली. आमचा गावात शिवलिंग बसवण्याला विरोध नाही, मात्र त्या ठिकाणी सुरू अनधिकृत आणि अघोरी कृत्यांना आमचा विरोध आहे.
आम्ही रुद्रनाथ फाउंडेशनचा अभ्यास केला, त्यावेळी असं समोर आलं की, रुद्रनाथ फाउंडेशन रजिस्टर ट्रस्ट आहे. त्यांचं ऑफिस सायन वेस्ट अंधेरीला आहे. या ट्रस्ट मध्ये वराड गावातील एकही व्यक्ती नाही.या ट्रस्टकडे अशा प्रकारचं मंदिर अथवा मूर्ती स्थापन करण्याची परवानगी नाही.
योगसाधना शिकवणे, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा देणे हा या ट्रस्टचा उद्देश आहे. असं असताना त्यांनी खोटं बोलून ही प्रतिकृती बसवली आहे. आम्हाला स्वयंभू महादेवा पेक्षा मोठा कोणीच नाही. माझ्या गावात जर स्वयंभू महादेव बसला आहे, तर आम्हाला दुसऱ्या कोणत्या स्फटिक शिवलिंगाची गरज नाही, असे ते म्हणाले.
या विरोधात लढा देणारः बाळा चिंदरकर शिवसेनेचे निरीक्षक बाळा चिंदरकर म्हणाले, माझ्या गावात मला माझ्या महादेवा पेक्षा कोणीच मोठा नाही. माझ्या देवावर माझी अतूट श्रद्धा असून याच देवामुळे महाराष्ट्रात आम्ही नेतृत्व करतो. माझ्या जन्म गावात चुकीचे प्रकार घडत असतील आणि ग्रामस्थांना आक्रोश सभा घ्यावी लागत असेल तर असले प्रकार आम्ही सहन करणार नाही. स्फटिक शिवलिंग बसवण्याचे प्रकार थोतांड आहेत. हा केवळ बिझनेस आहे. ही सगळी मंडळी ठग आहेत, फसवी आहेत. कोकणात असले प्रकार आम्हाला नको असे सांगून शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाला सोबत घेऊन या विरोधात लढा देणार असल्याचे ते म्हणाले. पैशाच्या नादाला लागून
गावात फुट पडू देऊ नकाः व्हिक्टर डॉन्ट्स व्हिक्टर डॉन्ट्स म्हणाले, आमच्या गावाबद्दल आम्हाला अभिमान आहे. यापूर्वी आम्ही एकत्र होतो, पण गावात फुट पाडण्याचे प्रयत्न केले जात असून श्री वेताळावर माझी श्रद्धा असून हा विषय नक्कीच मिटेल. आज गाव एकत्र आला आहे. त्यामुळे कायदा, कानून, न्याय, व्यवस्था सगळी फिकी आहे. ही नऊ माणसे येऊन वराड गावावर राज्य करणार आहेत का ? असा सवाल करून यांच्या पैशाच्या नादाला लागून गावात फुट पडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.