Mumbai Crime: कोयता डोक्यात अडकला; स्वत:च हॉस्पिटलमध्ये चालत आला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Mumbai Sion Hospital Attack: मुंबईतील सायन रुग्णालयात एक व्यक्ती डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेत चालत येताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केल्याची माहिती असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Mumbai Sion Hospital
Mumbai Sion Hospital Pudhari
Published on
Updated on

Mumbai Sion Hospital Attack: मुंबईमधील सायन हॉस्पिटल परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेत तो स्वतःच रुग्णालयात चालत येताना दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने हल्ला केला होता. गंभीर जखमी असूनही तो शुद्धीत राहून स्वतःच सायन रुग्णालयात पोहोचला. व्हिडिओमध्ये तो रुग्णालयाच्या परिसरात शांतपणे फिरताना, अगदी मोबाईल फोन पाहताना दिसत आहे, जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Mumbai Sion Hospital
West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जींचा पराभव कसा केला? विजयामागचं संपूर्ण गणित समजून घ्या

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईसारख्या शहरात वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. किरकोळ वादांमधूनही धारदार शस्त्रांचा वापर होण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा रंगली आहे.

Mumbai Sion Hospital
Thalapathy Vijay Net Worth: तामिळनाडूच्या राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या थलपथी विजयची संपत्ती किती? आकडा पाहून बसेल धक्का

दरम्यान, जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती कशी आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाबाबत अधिक तपशील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news