Nutrition Bar Controversy: विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? न्यूट्रिशन बारवर बंदीची जोरदार मागणी

महापालिका शाळांत वितरित बारमध्ये काचा-प्लास्टिक; सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
Nutrition Bar Controversy
Nutrition Bar ControversyPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना जानेवारीपासून पोषण आहारात देण्यात येत असलेले न्यूट्रिशन बार (चॉकलेट) वादात सापडले आहे. त्यात काचा, प्लास्टिक व दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार विधानसभेत समोर आल्यानंतर त्याचे पडसाद मंगळवारी मुंबई महापालिका सभागृहातही उमटले. हे न्यूट्रिशन बार विद्यार्थ्यांसाठी पोषख नसून अपायकारक आहे. त्यामुळे त्यावर कायमची बंदी घाला, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

Nutrition Bar Controversy
Mumbai Startup Innovation Hub: मुंबईत जागतिक दर्जाचे स्टार्टअप इनोव्हेशन हब; अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा संकल्प

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत हा विषय मांडला होता. त्यानंतर महापालिका सभागृहात मंगळवारी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी हा विषय मांडला.

माजी महापौर तथा विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मुदत संपलेली न्यूट्रिशन बार पुरविली जात असल्याचा आरोप करीत असे जीवघेणे धंदे थांबावा, अशी मागणी केली. शिंदे गटाच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढत कंत्राटदारांसह संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Nutrition Bar Controversy
India LPG Shortage: भारतात LPG तुटवड्याचा पहिला बळी.... पंजाबमधील सेहना गावात घडली दुर्दैवी घटना

उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांनी न्यूट्रिशन बारचे उत्पादन हे भिवंडी येथे होते. आपल्याला भिवंडी किती भयानक आहे, हे माहीत आहे. यामुळे याची प्रयोगशाळेत प्रत्येक महिन्याला तपासणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत दर्जेदार, नामांकित कंपनीकडूनच याची खरेदी करावी,अशी मागणी केली. इस्कॉनची खिचडी पुन्हा सुरू केली तर बरे होईल, अशी अपेक्षा नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी व्यक्त करीत बिस्कीट, शेगदाणेही सुरू करा, अशी मागणी केली आहे.

Nutrition Bar Controversy
ZP Nominated Members: झेडपीत ‘स्वीकृत सदस्यां’चा मार्ग मोकळा; विधेयकाला विधानसभा मंजुरी

आठवड्यातून दोन वेळा वाटप

महानगरपालिका शाळेतील बालवाडी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना न्यूट्रिशन बार हे जानेवारी 2026 पासून वाटप केले जात आहे. ते आठवड्यातून दोन वेळा दिले जात आहे. लहान मुले ते खात आहेत. मात्र मोठी मुले फेकून देत असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले.

ही केंद्र सरकारची योजना असून याचे कंत्राट एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकडे आहे. यामुळे नगरसेवकांची आक्रमता कायम राहते का? हे कंत्राट रद्द होते का? याकडे पालिका शाळेतील शिक्षकांसह पालकांचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news