

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 227 वॉर्डपैकी 16 वॉर्डमध्ये अनुसूचित जातीच्या, तर 1 वॉर्डमध्ये अनुसूचित जमातींच्या मतदारांची संख्या अधिक आहे. या वॉर्डांमधून मोठ्या प्रमाणात मतदान होत असल्यामुळे सर्व पक्षांनी या ठिकाणी आपली ताकद लावल्याचे चित्र आहे. या प्रमुख मागास घटकांची 9 लाख 32 हजार 884 मते मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी व्यूहरचना केली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 होती. त्यामध्ये मुंबई शहर 3 लाख 85 हजार 411 तर मुंबई उपगरात लोकसंख्या 93 लाख 56 हजार 962 होती. त्यानंतर जनगनणा झाली नाही.
त्यामुळे सध्या राज्य निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार मुंबईत 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार आहेत. त्यामध्ये एससी 8 लाख 3 हजार 236 तर एसटी 1 लाख 29 हजार 653 असे मिळून 9 लाख 32 हजार 884 मागासवर्गीय मतदार आहेत.