Mumbai News
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू केली असताना विरोधकांनी मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीविरोधात शनिवारी मोर्चा काढत एकजूट दाखविली. 'सत्याचा मोर्चा' या नावाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला पोलिसांनी मात्र परवानगी दिली नव्हती. त्यामुळे प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतचोरी आणि दुबार नावे या मुद्यांवरून मनसेसह महाविकास आघाडीचा शनिवारी फैशन स्ट्रीटपासून मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाको पक्ष, कॉग्रेस, शेकाप, माकप या महाआघाडीतील पक्षांसह मनसेही सहभागी झाला होता.
यावेळी मोर्चाला उद्देशून बोलताना शरद पवार यांनी, या मोचनि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण झाल्याचे सांगितले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राज ठाकरे म्हणाले, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा म्हणजे फक्त ठिणगी आहे, या ठिणगीचा कधीही वणवा होऊ शकतो, असा इशारा दिला.