Navi Mumbai Super Speciality Hospital: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावावरून वाद; महासभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा फिरवली

नवी मुंबईत स्थानाबाबत संभ्रम कायम; सत्ताधाऱ्यांकडूनच प्रस्तावात बदल, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Navi Mumbai Municipal Election
Navi Mumbai Municipal ElectionPudhari
Published on
Updated on

नवी मुंबई : आ. मंदा म्हात्रे यांनी अथक प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला गुरु तेग बहादूर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे कार्यक्रमात केली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या नवी मुंबईच्या महासभेत भाजपच्या नगरसेवकांनीच ही

घोषणा फिरवली. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी रुग्णालयाच्या स्थळाचा उल्लेख केला नव्हता. हे रुग्णालय दिघ्यापासून उरणपर्यंत कुठेही होऊ शकते, असा युक्तिवाद भाजपच्या नगरसेवकांनी यावेळी केला.

Navi Mumbai Municipal Election
Dawood Ibrahim Properties Auction | कुख्यात दहशतवादी दाऊदच्या चार मालमत्तांचा लिलाव

आ. मंदा म्हात्रे यांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला होता. मात्र तरीही नवी मुंबई कुणाच्या बापाची नाही, असे ठामपणे सांगत आ. मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडून या रुग्णालयाला मंजुरी मिळवली होती. मात्र या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी दुसऱ्यांदा थेट कात्रजचा घाट दाखवला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीद दिनानिमित्त खारघर येथे आयोजित केलेल्या सोहळ्याला संबोधित करताना गुरू तेग बहादूर यांचे नाव नवी मुंबईत उभ्या

Navi Mumbai Municipal Election
Big Breaking | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

राहणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी शुक्रवारी महासभेत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. बेलापूर येथील सेक्टर 15 मध्ये नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहात आहे. त्याचाही चौगुले यांनी प्रस्तावात उल्लेख केला होता.

Navi Mumbai Municipal Election
Mumbai News | मुंबईतील चार हजार स्टॉल धारकांवर फेरीवाल्यांचा शिक्का?

या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपचे नगरसेवक सूरज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलच्या भूखंडाचा उल्लेख केलेला नाही, असे सांगत हरकत घेतली. त्याला सभागृह नेते सागर नाईक यांनी दुजोरा दिला. सिडकोची नवी मुंबई फक्त दिघ्यापासून बेलापूरपर्यंत नाही तर पनवेलपासून तळोजा, कळंबोली, उरणपर्यंत आहे. त्यामुळे त्या भागात उभ्या राहणाऱ्या रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार नाव देण्यात यावे, अशी सुधारणा या प्रस्तावात करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे पुन्हा एकदा हे हॉस्पिटल नेमके उभारणार कुठे, याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news