

Mumbai COVID Cases June 2025
मुंबई : जानेवारी 2025 पासून मुंबईसह राज्यात कोविडने पुन्हा डोके वर काढल्याने दररोज कोविड बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मंगळवार, 10 जून रोजी मुंबई शहरांतून 32 तर राज्यभरांतून 615 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तर यामध्ये एका रूग्णाचा मृत्यु झाल्याचे समोर आले.
जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण रुग्णांची संख्या ही 719 झाली आहे. तर 18हजार 103 कोविड चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये 1593 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. तर आतापर्यंत 959 रुग्ण बरे झाले झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.
मुंबई 32
पुणे महानगरपालिका 23
ठाणे महानगरपालिका 03
नवी मुंबई महानगरपालिका 01
कल्याण महानगरपालिका 04
मीरा भाईंदर महानगरपालिका 01
रायगड 01
पुणे 01
पीसीएमसी 09
सातारा 03
सांगली 01
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 04
गोंदिया 01
चंद्रपूर 02
नागपूर महानगरपालिका 03