Mumbai Rain Update: मुंबईत पाऊस परतला! पूर्व उपनगरांत सर्वाधिक ४२ मिमी पाऊस

मुंबईत गेल्या आठवड्यात पूर्णपणे विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. सोमवारी संपूर्ण शहरात पाऊस सक्रिय झाला.
Mumbai Rain
Mumbai RainPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई शहर व उपनगरांत पाऊस सक्रिय झाला असून सोमवारी दिवसभर तुरळक पावसासह जोरदार सरी पडल्या. काही सखल भाग वगळता फारसे पाणी तुंबले नाही. मात्र पावसामुळे वाहतूक मंदावली होती. पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकलही ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

मुंबईत गेल्या आठवड्यात पूर्णपणे विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. सोमवारी संपूर्ण शहरात पाऊस सक्रिय झाला.

Mumbai Rain
Mumbai Local Train Assault: लोकलमध्ये दोन तृतीयपंथींनी प्रवाशाला चोपले; सापळा रचून चोवीस तासांत दोघांना पकडले

काही भागात वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. शहर व पूर्व उपनगरांत पावसाचा जोर जास्त होता. यात १८ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या पडल्या. ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या किरकोळ घटना घडल्या. तर पाच ठिकाणी घराच्या भिंती पडल्या, मात्र यात कुणालाही मार लागला नाही.

Mumbai Rain
Fake Cosmetics: भेसळयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा भडिमार; संपूर्ण आरोग्यावर थेट वार

अधूनमधून पडलेल्या जोरदार सरी व धुरकट वातावरणामुळे वाहनांचा वेग मंदावून दक्षिण मुंबईसह सायन, चेंबूर, मानखुर्द जंक्शन, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, अन्य ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. विरार-चर्चगेट व कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news