Mumbai Rain Update : मुंबईत शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर

आज मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता
Mumbai Rain Update
मुंबईत शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे. Mumbai Rain Update

मुंबईत जोरदार पाऊस

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईत (Mumbai rains) आज मध्यरात्री १ ते सकाळी ७ वाजेदरम्यानच्या ६ तासांत सुमारे ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १. ५७ वाजता समुद्रात ४. ४० मीटर उंच भरती आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या दुसऱ्या सत्रासाठीही सुट्टी

"मुंबईत आजही मुसळधार पाऊस (Mumbai rains) पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील सर्व बीएमसी, सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली.

दरम्यान मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी १. ५७ वाजता समुद्रात ४. ४० मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात येत आहे.

रेल्वे गाड्यांना विलंब

मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवरील पाणी काढण्यासाठी उच्च क्षमतेच्या जलपंपांचा वापर केला जात असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. Mumbai Rain Update

मुंबई आणि उपनगरांत मध्यरात्री १ ते स. ७ दरम्यान सर्वाधिक पाऊस पडलेली ठिकाणे

  • वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

  • एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

  • मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

  • चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

  • आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

  • नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

  • जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

  • प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

  • नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

  • लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

  • शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

  • रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

  • धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

  • बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news