Mumbai Police Drug Bust : मुंबई पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई, तब्‍बल २१.१३ कोटी रुपयांचे कोकेन जप्‍त

Mumbai Police Drug Bust : संशयिताच्‍या मालाड पश्चिम येथील मढ व्हिलेजमधील राहत्या घरावर छापा
Crime News
Crime News File Photo
Published on: 
Updated on: 

Mumbai Police Drug Bust

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलिसांनी गोरेगाव पश्चिम येथील लिंक रोड परिसरात अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्‍बल 21 कोटी 13 लाख 48 हजार 500 रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. फुलचंद्र ईश्वरदयाल कश्यप (वय 31) असे ताब्‍यात घेतलेल्‍या संशयित आरोपीचे नाव आहे. त्‍याने अमली पदार्थ कुठून आणले, कोणाला विक्री केले जाणार होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

संशयिताच्‍या घराची झडती

फुलचंद्र कश्यप हा अमली पदार्थांची तस्करी करत असल्‍याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार, आरोपीच्या मालाड पश्चिम येथील मढ व्हिलेजमधील राहत्या घराची झडती घेतली. फुलचंद्र कश्यप याच्‍याकडून कोकेन जप्त करण्‍यात आले आहे.

Crime News
Kishtwar Terror Attack : धक्‍कादायक! जम्मू आणि काश्मीरमध्ये बेपत्ता दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह सापडले

बांगूरनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल

पोलिसांनी या कारवाईत 4226.97 ग्रॅम म्हणजेच सुमारे 4.2 किलो कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी बांगूरनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान आरोपीचा साथीदार मुजाहिद अली याचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे.

Crime News
Mumbai Crime News: अंधेरीत ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना अटक

दोन्‍ही संशयितांकडून २१.१३ कोटी रुपयांचे कोकेन जप्‍त

पोलिसांकडून मुजाहिद अली याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून जप्त केलेल्या कोकेनची एकूण किंमत 21.13 कोटी रुपये आहे. हे कोकेन कुठून आणले, कोणाला विक्री केले जाणार होते आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Crime News
Mumbai Crime : २५ वर्षांपासून फरार गँगस्टर हेमंत पुजारी जाळ्यात! छोटा राजनचा माजी साथीदार पुन्हा तपास यंत्रणांच्या रडारवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.