Kishtwar Terror Attack : धक्‍कादायक! जम्मू आणि काश्मीरमध्ये बेपत्ता दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह सापडले

Kishtwar Terror Attack : : मृतदेह गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेत, शस्त्रेही गायब
Kishtwar missing SPOs found dead :
Kishtwar missing SPOs found dead :Pudhari
Published on: 
Updated on: 

Kishtwar missing SPOs found dead : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे (SPOs) मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या अंगावर गोळ्यांच्या अनेक खुणा आहेत. त्‍यांच्‍या असणारी शस्त्रेही घटनास्थळी सापडलेली नाहीत, त्‍यामुळे या कृत्‍यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मृत पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख बाबी चंद (वय ५७) आणि रशपाल कुमार ( वय ४५) अशी पटली आहे. हे दोघेही स्थानिक पोलिसांच्या 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप' (SOG) चे सदस्य होते. सध्‍या त्यांची नियुक्ती दच्छन भागातील 'कियार' गावात करण्यात आली होती.

विशेष पोलीस अधिकारी किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागातून बेपत्ता

विशेष पोलीस अधिकारी बॉबी चंद आणि रशपाल कुमार बुधवारी किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम 'दच्छन' (Dachhan) परिसरातून बेपत्ता झाले होते. ते 'कियार' गावातील आपल्या छावणीतून 'धर्ना-मरवाह' (Dharna-Marwah) येथील लष्करी चौकीच्या दिशेने निघाले होते, परंतु ते आपल्या नियोजित स्थळी पोहोचलेच नाहीत.

Kishtwar missing SPOs found dead :
Terrorists killed Jammu and Kashmir: जम्मु-काश्मीरमध्ये मोठी चकमक; जैश-ए-मोहम्मदचे २ दहशतवादी ठार, अजूनही शोधमोहीम सुरूच

स्‍थानिकांनी ऐकला गोळीबाराचा आवाज

दोन्‍ही पोलीस अधिकार्‍यांचे मोबाईल फोनही बंद होते. स्थानिक रहिवाशांनी गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यानंतर, पोलीस आणि लष्कराच्या 'राष्ट्रीय रायफल्स'ने संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली. बॉबी चंद आणि रशपाल कुमार स्थानिक पोलिसांच्या 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप' (SOG) मध्ये तैनात होते. दोघांच्‍या शोधमोहिमेसाठी दुर्गम, डोंगराळ आणि घनदाट जंगल असलेल्या परिसरासह आसपासच्या सर्व भागांत सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले होते.

Kishtwar missing SPOs found dead :
Kishtwar Cloudburst | ‘रात्रीची शांतताही आता भीतिदायक वाटते’

अत्‍यंत दुःखद घटना : आमदार शगुन परिहार

'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना किश्तवाडच्या आमदार शगुन परिहार म्हणाल्या, "दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या (SPO) हत्येची ही घटना अत्यंत दुःखद आहे. आमच्या दक्षिण भागातील दोन विशेष पोलीस अधिकारी मारले गेले आहेत. ते काल रात्री बेपत्ता झाले होते. गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी करणार आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, बुधवारी दुपारी कुलगाममधील एका सुरक्षा चौकीवर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) तीन जवान जखमी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.