Mumbai News: मुंबईत १५ दिवस जमावबंदी! पाच किंवा अधिक जणांच्या एकत्र येण्यास मनाई

मिरवणुका आणि मिरवणुकीतील ध्वनिक्षेपक, वाद्ये व फटाक्यांवरही निर्बंध
Mumbai News
Mumbai NewsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच संभाव्य अनुचित घटना, दंगल आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी २१ ऑक्टोबर रोजी हा आदेश काढला. त्यानुसार, २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील.

Mumbai News
Murud beach tragedy case: चौदा विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना १० वर्षांनंतर दिलासा; एफआयआर रद्द

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(३) आणि कलम १०(२) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास तसेच मिरवणुकीत ध्वनिक्षेपक, वाद्ये, वाद्यवृंद आणि फटाक्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, या आदेशातून विवाह समारंभ, अंत्यसंस्कार आणि स्मशानभूमी किंवा दफनभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रांना सूट देण्यात आली आहे. कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या कायदेशीर बैठका तसेच सामाजिक मेळावेही या निर्बंधांतून वगळण्यात आले आहेत.

Mumbai News
Marco Rubio India visit: मार्को रुबिओ यांचा भारत दौरा संपन्न; ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारावर चर्चा

चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी जमणारे नागरिक, सरकारी व निमसरकारी कामांसाठी सरकारी कार्यालये आणि न्यायालयांमध्ये येणारे लोक, तसेच शाळा-महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक उपक्रमांसाठी जमणाऱ्यांनाही सूट देण्यात आली आहे.

कारखाने, दुकाने आणि अन्य आस्थापनांमधील नियमित कामकाजासाठी होणाऱ्या गर्दीलाही हे निर्बंध लागू होणार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news