Mumbai Extortion Case | मुंबईत ट्रक चालकांकडून ५ लाखांची खंडणी घेताना रंगेहात अटक: आतापर्यंत 12 लाखांची खंडणी गोळा केल्याचे उघड

अंधेरी साकीनाका येथील खंडणी विरोधी पथकाची कारवाई
Extortion Case | खंडणी
Extortion Case | खंडणीPudhari News Network
Published on
Updated on

Truck Driver Extortion Case

मुंबई : अंधेरी साकीनाका येथील खंडणी विरोधी पथकाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार रेशनिंग दुकानासाठी धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना दमदाटी करून खंडणी वसूल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपीने आतापर्यंत 12 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम खंडणी स्वरूपात घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आई बाबा फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक योगेश रमेश मोरया याने गेल्या काही दिवसांपासून ट्रक मालक प्रवीण गामी यांना सातत्याने धमक्या देत त्यांच्या रेशनिंग दुकानांना पुरवठा करणाऱ्या ट्रक चालकांना अडवून दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी देत, “धंदा करायचा असेल तर खंडणी द्यावीच लागेल,” असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी साडेबारा लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.

Extortion Case | खंडणी
Central Railway delay Mumbai: मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली; चाकरमान्यांचे प्रचंड हाल

आरोपी योगेश मोरया याने आपल्याकडे 120 लोकांची टोळी असल्याचे सांगून दहशत निर्माण केली होती. यामुळे भीतीपोटी फिर्यादी प्रवीण गामी यांनी आतापर्यंत मोठी रक्कम अदा केली. मात्र, सतत होणाऱ्या दमदाटीला कंटाळून आणि आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी खंडणी विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच खंडणी विरोधी पथकाने सखोल तपास सुरू करून सापळा रचला. आरोपीने आणखी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्यानंतर फिर्यादी प्रवीण गामी यांनी पैसे देण्यास होकार दर्शवला. ठरल्याप्रमाणे अंधेरी साकीनाका मेट्रो स्टेशनच्या खाली आरोपी पैसे स्वीकारण्यासाठी येताच खंडणी विभागाच्या पथकाने योगेश रमेश मोरया याला रंगेहात अटक केली.

Extortion Case | खंडणी
Mumbai Pollution: प्रदूषण नियंत्रणात पालिकांचे अपयश; उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

या प्रकरणी योगेश रमेश मोरया, राजनसिंग उर्फ बटला, मनोज गुप्ता व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने कथित 120 लोकांची टोळी असल्याचे सांगून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news