Mumbai parking fee hike: मुंबईकरांचे पार्किंग 40 टक्क्यांनी महागणार

2021 नंतर प्रथमच पार्किंग शुल्कात वाढ होईल
Mumbai parking fee hike
Mumbai parking fee hikePudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई: महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या पे-अँड-पार्क सुविधांच्या पार्किंग शुल्कात 40 टक्के वाढ करण्याच्या हालचाली पालिका स्तरावर सुरू आहेत. ही वाढ झाल्यास मुंबईत पार्किंगसाठी नेहमीपेक्षा 30 ते 40 रुपये अधिकचे मोजावे लागतील.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आता फक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याच कार्यालयाकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

Mumbai parking fee hike
Supriya Sule Car Accident: खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात; गुजरात मधल्या गाडीची धडक

दरवाढीचा प्रस्ताव त्यानंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेसमोर जाईल आणि त्यानंतरच 2021 नंतर प्रथमच पार्किंग शुल्कात वाढ होईल. मात्र असा प्रस्ताव आल्यास तो हाणून पाडण्याचे संकेत विरोधी पक्षांनी दिले आहेत. पे-अँड-पार्क साठी 30 ते 40 रुपयांची वाढ केल्यास ती मुंबईकरांना परवडणार नसल्याचे काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आझमी यांनी सांगितले.

जुने दर मार्च 2021 मध्ये संपुष्टात आले आहेत. सध्याचे पार्किंग धोरण 2015 साली लागू झाले. नागरिकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने 2017पर्यंत दर वाढीवर स्थगिती दिली होती. कोविड काळात मार्च 2022 मध्ये पालिका सभागृह विसर्जित झाल्यानंतर पार्किंग शुल्कात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे आता सध्याच्या पार्किंग शुल्कात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करण्याच्या हालचाली आहेत.

Mumbai parking fee hike
Mumbai SSC Result: मुंबई विभागात 1,461 शाळांची ‌‘शतकी‌’ कामगिरी

दुचाकी पार्किंगसाठी सध्या 20 ते 100 रुपये आकारले जातात. टॅक्सी आणि चारचाकी वाहनांसाठी ताशी 70 ते 235 रुपये आणि बससाठी ताशी 100 ते 615 रुपये आकारले जातात. बी श्रेणीतील दुचाकी वाहनांसाठी 15 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 45 ते 155 रुपये आकारले जातात.

निवासी भागात सी श्रेणीसाठी दुचाकी वाहनांसाठी 10-35 रुपये, चारचाकी वाहनांसाठी 25 रुपये आणि अवजड मोटार वाहनांसाठी 35 ते 200 रुपये शुल्क आकारले जात आहेत. हे सर्व दर चाळीस टक्क्यांनी वाढवण्याचा विचार महापालिकेत बळावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news