Aditya Thackeray: मुंबईतील मोकळी मैदाने भाजपने ढापली; आमदार आदित्य ठाकरे यांचा आरोप

आंदोलन राजकीय नाही. मोकळी मैदाने गेली तर मुंबईत मोकळा श्वास घेण्यासाठीही जागा उरणार नाही.
Aditya Thackeray
Aditya ThackerayPudhari
Published on
Updated on

मुलुंड: मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या आरक्षणात बदल करून ती भूखंडे भाजपशी संबंधित संस्थांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या चार वर्षांत मुंबईतील १७ ते १८ मोकळी मैदाने भाजपने ‘ढापली’ असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शनिवार दि. २२ रोजी मुलुंड पूर्व येथील क्रीडा संकुलासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाची आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Aditya Thackeray
Milk Adulteration: दूध भेसळीला आता गुन्हेगारी साखळीचाही हातभार

मुंबईतील बेस्टची २२ आगारे, मुलुंडमधील दोन भूखंड, वांद्रे येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान तसेच अंधेरी-जुहू परिसरातील मोकळी मैदाने भाजपशी संबंधित संस्थांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन राजकीय नाही. मोकळी मैदाने गेली तर मुंबईत मोकळा श्वास घेण्यासाठीही जागा उरणार नाही.

झेन-जीसाठी मैदानेच उरली नाहीत तर त्यांनी खेळायचे कुठे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करीत या आंदोलनात पक्ष भेद विसरून सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंबईतील मोकळ्या जागा, मैदाने आणि आरक्षित भूखंड आपल्या मर्जीतील कंत्राटदार आणि भाजपशी संबंधित संस्थांच्या घशात घालण्याचा धडाका राज्य सरकारने लावला आहे.

Aditya Thackeray
Mosquito Borne Diseases: मलेरिया, डेंग्यूचा मुंबई हॉटस्पॉट; राज्यात मलेरियाचे १२ हजारांहून अधिक रुग्ण

ज्या जागेवर मुंबईतील तरुणांसाठी एक उत्तम क्रीडा संकुल उभे राहू शकत होते, त्याचे आरक्षण बदलून तिथे पेट्रोल पंप उभारण्याचा घाट मुख्यमंत्री आणि भाजप राजवटीने घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच भूखंडाच्या अगदी समोर आधीच एक पेट्रोल पंपासाठी आरक्षित असलेली जागा आहे, जी थेट हायवेला जोडली जाऊ शकते. असे असतानाही केवळ विकासक मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठी हा आरक्षणाचा खेळ सुरू आहे.

वांद्रे येथे 'रेड कार्ड' दाखवण्यासाठी तिरंगा आंदोलन

मुंबईची ही लूट थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी उद्या, रविवार २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता वांद्रे पश्चिम येथील नेव्हिल डिसूझा फुटबॉल टर्फ येथे मोठ्या 'तिरंगा आंदोलनाची' हाक दिली आहे. या आंदोलनात कोणताही पक्षीय ध्वज नसेल. सर्व मुंबईकर, क्रीडाप्रेमी आणि तरुणांनी हातात तिरंगा घेऊन भाजप सरकारला 'रेड कार्ड' दाखवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी या दौऱ्यादरम्यान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news