Whale calf in Mumbai | वांद्रे- वरळी सि-लिंकजवळील किनाऱ्यावर सापडले महाकाय व्हेल माशाचे पिल्लू, वाचवण्याचे प्रयत्‍न निष्फळ!

समुद्रातील भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आल्याची शक्यता
Whale calf in Mumbai
Whale calf in Mumbai
Published on
Updated on

Whale calf in Mumbai मुंबईच्या अरबी समुद्रात वांद्रे-वरळी सी लिंक जवळील कार्डर रोड किनाऱ्यालगत एका महाकाय व्हेल माशाचे पिल्लू (Whale Calf) वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या माशाच्या पिलाची लांबी २६ फूट इतकी आहे. तसचे हे हंम्पबॅक व्हेलचे पिलू असल्याची माहीती समोर आली आहे. त्यानंतर वनविभाग, महापालिका प्रशासन आणि वन्यजीव पशु वैद्यकीय तज्ज्ञांनी संयुक्तपणे बचावकार्य हाती घेऊन पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

हे पिल्लू किनाऱ्यावरील लाटांमध्ये अडकल्याचे व पाण्यात जाण्यासाठी तडफडत असल्याचे वांद्रे-वर्सोवा सी-लिंक प्रकल्पावर काम करणाऱ्या मजूरांना हे पिल्लू दिसले. कामगारांनी जेव्हा या पिलाला पाहिले त्‍यावेळी ते खडकामध्ये अडकल्याने तडफडत होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दल, वन विभाग यांची टीम घटनास्थळी दाखल झाली

भरतीमुळे आले किनाऱ्यावर

समुद्राला आलेल्या भरतीच्या लाटांमुळे हे पिल्लू मुख्य प्रवाहापासून भरकटले आणि किनाऱ्यावरील खडकाळ व उथळ भागात अडकले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण त्‍याला पाण्याबरोबर आत जाता आले नाही ते किनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकून पडले. सुरवातीला ते पाण्यात जाण्यासाठी धडपड करत होते पण त्‍याला ते जमले नाही

वाचवण्याचे प्रयत्‍न अपयशी

वन विभाग आणि मरीन रेस्क्यू टीमने या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतरही या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बचाव पथकाने त्‍याला ढकलण्याचा प्रयत्‍न केला पण निष्फळ ठरला, शेवटी त्‍याचा अंत झाला. यानंतर क्रेन मागणवण्यात आली तेथून बाहेर काढण्यात आले. यानंतर वर्सोवा किनाऱ्यावर त्‍याला पुरण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news